नवीन घराचे फोटो शेअर करत तापसी पन्नू भावूक

तापसी पन्नूचा खास लूक 

Updated: Mar 16, 2021, 11:13 AM IST
नवीन घराचे फोटो शेअर करत तापसी पन्नू  भावूक title=

मुंबई: अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आजकाल तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या पुर्वी घरी पडलेल्या  आयकरांच्या छापाची बरीच चर्चा होती.  तापसी पन्नूने (Taapsee Pannu)सोशल मीडियावर असे फोटो शेअर केले आहे आणि ते पाहून लोक आश्र्चर्य झाले. अलीकडेच तिच्या कमाईसंदर्भात प्रश्नचिन्हांत घेरलेल्या तापसीने आता नवीन घर घेतले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

सोमवारी इन्स्टाग्रामवर एका पोस्टमध्ये तापसी पन्नूने (Taapsee Pannu) तिच्या घराची झलक चाहत्यांसोबत शेअर केली. या अभिनेत्रीने तिच्या लिव्हिंग रूमचे फोटो पोस्ट केले असून त्यात व्हिंटेज सोफा सेट आणि लाकडी नक्षीकाम केलेला टेबल मध्यभागी आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

हे फोटो शेअर करुन तापसी पन्नूने अतिशय भावनिक मार्गाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'घरः अशी जागा जिथे मित्र भेटतात, कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि प्रेम वाढते.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या सिनेमामध्ये दिसणार तापसी

अभिनेत्री सध्या अनुराग कश्यपच्या ‘दोबारा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे. चित्रपट निर्माता आणि अभिनेत्री नुकताच आयकर विभागाने त्यांच्या घरात शोध घेण्याच्या चर्चेत आल्या होत्या. त्याचा 'लूप लपेटा' हा चित्रपटही रिलीजसाठी तयार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे.