तेजस्विनीची 'लूजरवाली गरबा स्टेप' होतेय व्हायरल!

 तेजस्विनी पंडितची 'लुजरवाली गरबा स्टेप' खूपच व्हायरल होत आहे. 

Pravin Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 22, 2017, 07:57 PM IST
तेजस्विनीची 'लूजरवाली गरबा स्टेप' होतेय व्हायरल!

मुंबई : गरबा आणि सेलिब्रिटींच एक वेगळ नात असत. अनेक ठिकणी सेलिब्रिटी गरब्यावर ठेका धरत असतात. यावेळेस मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितची 'लुजरवाली गरबा स्टेप' खूपच व्हायरल होत आहे. त्यात तिने तिला आवडलेली गरबा स्टेप करुन दाखविली आहे.
सोशल मीडियात सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तेजस्विनी पंडित आपल्या व्हॅनिटी व्हॅनमधऊन बाहेर येतेय आणि तिला कॅमेरामागून एक रिपोर्टर नवरात्रीसाठी एक बाइट मागत आहे. तेजस्विनी बाइटसाठी तिला नकार देते  आणि यापलीकडे काहीतरी कराव अस म्हणते. यावेळी तिच्या काहीतरी मनात येतं आणि ती स्वत:च्या आवडीची गरबा स्टेप करुन दाखवते. दरम्यान हा व्हिडिओ कुठे पोस्ट करु नका असेही यामध्ये म्हणताना दिसत आहे. पण हा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर टाकला. एका दिवसात ह्या व्हिडीओने लाखात व्ह्यू कमावले आहेत.

loserwaligarbastep (लूजरवाली गरबा स्टेप) ज्यात तिने तिची आवडती लूजरवली गरबा स्टेप करून दाखवली आणि त्याचा व्हिडीओ तिने आपल्या सोशल मीडियावर टाकला. आता #loserwaligarbastep करून दाखवण्याचे Challenge हे दोघे घेतील ही अपेक्षा आहे. त्यानंतर त्यांचे व्हिडीओज ही लवकरच त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळणार आहेत. 

सिद्धार्थ आणि नम्रताला चॅलेंज 

यावेळी तिला एक आयडिया सुचते. प्रत्येकाला एक लुजरवाली गरबा स्टेप येत असते. ती त्याने करुन दाखवावी असे ती आवाहन करते. तिने सध्या अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री नम्रता आवटे हिला हे आवाहन केलं आहे.