सिद्धार्थ आणि शेहनाजची शेवटची गोष्ट येणार प्रेक्षकांसमोर

कोणती आहे सिद्धार्थ आणि शेहनाजची शेवटची गोष्ट? चाहत्यांना मिळणार आनंदाची बातमी

Updated: Oct 17, 2021, 01:11 PM IST
सिद्धार्थ आणि शेहनाजची शेवटची गोष्ट येणार प्रेक्षकांसमोर

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री शेहनाज गिल स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. सिद्धार्थच्या निधनानंतर शेहनाज सोशल मीडियापासून दूर होती. आता शेहनाज 'हैसला रख' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आहे. यानंतर सिद्धार्थ आणि शेहनाजबद्दल एक गोष्ट अशी आहे जी ऐकून त्यांच्या चाहत्यांना मोठा आनंद होणार आहे. शेहनाज आणि सिद्धार्थचा ‘अधूरा’ (Adhura) गाणं लवकरचं प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी लवकरचं ‘अधूरा’ (Adhura)गाण्याचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे.                    

सिडनाजचे चाहत्यांना ते एका म्युझिक अल्बमद्वारे एकत्र दिसतील. सिद्धार्थने त्याच्या मृत्यूच्या काही दिवस आधी शूट केले. निर्मात्यांनी या गाण्याला 'अधुरा' असे नाव दिले आहे. सध्या या गाण्याची सर्वत्र चर्चा आहे. ज्याची घोषणा नुकतीच ट्विटरवर करण्यात आली. यानंतर, या गाण्याशी संबंधित प्रत्येक अपडेटबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये वाढली.

दरम्यान, शहनाज गिल (Shehnaaz Gill) दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आणि सोनम बाजवा यांच्या भूमिका असणारा 'हौसला रख' हा पंजाबी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 

बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला बंपर ओपनिंग अर्थात प्रेक्षकांचा दणदणीत प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पहिल्य़ाट दिवशी या चित्रपटाच्या खात्यात तब्बल 2 कोटी 55 लाख रुपयांची कमाई जमली आहे.