मुलांबाबत विराट - अनुष्काचं हे प्लानिंग

काय आहे प्लानिंग 

मुलांबाबत विराट - अनुष्काचं हे प्लानिंग  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचा नवरा टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्का आणि विराटने गेल्यावर्षी 11 डिसेंबर रोजी लग्न केलं. ही बी टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेलं लग्न आहे. लग्नानंतर विराट अनुष्कासोबत पहिल्यांदा बर्थडे सेलिब्रेशन करत आहे. 

विराटने आपल्या मुलाखतीत सांगितलं की, माझ्या आयुष्यात अनुष्का आल्यानंतर खूप सकारात्मक बदल झाला आहे. त्याने सांगितलं की, अनुष्का खूप धार्मिक आहे. तिच्यासोबत राहताना मी देखील अनेक चांगले बदल केले आहेत. विराट खूप शांत झाला आहे. विराटने एका मुलाखतीत आपल्या मुलाबद्दल देखील सांगितलं आहे. जेव्हा मला मुलं होतील तेव्हा मी घरात आपल्या माझ्या सोयीच्या गोष्टी ठेवणार नाहीत. 

विराटच्या म्हणण्यानुसार तो ट्रॉफी, अचिव्हमेंट आणि यासारख्या अनेक गोष्टी काढून टाकणार आहेत. ज्या गोष्टी तिच्या करिअरला फ्लॅश करणार आहे. विराटच्या माहितीनुसार अनुष्काला विचारात घेऊन हा निर्णय घेतला आहे. विराटने अनुष्का त्याची पत्नी ही ऑफ द फील्ड कॅप्टन आहे असं सांगितलं. विराट सांगतो की, अनुष्का कायमच योग्य निर्णय घेते.