प्रदर्शनापूर्वीच 'टायगर जिंदा है' ने रचला विक्रम!

सलमान कतरिनाच्या 'टायगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 9, 2017, 05:18 PM IST
प्रदर्शनापूर्वीच 'टायगर जिंदा है' ने रचला विक्रम! title=

मुंबई : सलमान कतरिनाच्या  'टायगर जिंदा है' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर चांगलाच लोकप्रिय झाला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या २४ तासात हा ट्रेलर २ कोटी ९ लाख लोकांनी पाहिला. त्यामुळे सलमानच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षक अत्यंत उत्सुक आहेत, हे दिसून येते. 

सलमानचा हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. 'ट्यूबलाइट'च्या अपयशानंतर हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  'टायगर जिंदा है' चा ट्रेलर फेसबूकवर १ कोटी ३ लाख तर, यू-ट्यूबवर १ कोटी ६ लाख म्हणजेच एकूण २ कोटी ९ लाख लोकांनी पाहिला आहे. ही संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. 

मंगळवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील सलमानच्या भारदस्त लूक, डायलॉग, थरारक दृश्य तसंच कतरिनाच्या लूक देखील लक्षवेधी ठरत आहे.