प्रसिद्ध अभिनेत्रीने ब्रेकअपवर सोडलं मौन, 'त्याने संपूर्ण शरीरावर माझ्या नावाचं टॅटू...'

अभिनेत्री म्हणाली,  'ते नातं म्हणजे लहानपणी झालेली चूक...'  

Updated: Nov 27, 2021, 03:26 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्रीने ब्रेकअपवर सोडलं मौन, 'त्याने संपूर्ण शरीरावर माझ्या नावाचं टॅटू...'

मुंबई : .उर्फीला तिच्या विचित्र कपड्यांमुळे कायम ट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. पण आता उर्फी एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. उर्फी तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. बिग बॉस ओटीटी फेम उर्फी 'अनुपमा' मालिकेतील अनुपमाच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या पारस कलनावरसोबत रिलेशनशिपमध्ये होती.

आता पारस आणि उर्फी एकत्र नाहीत ही गोष्ट सगळ्यांनाच माहीत आहे. पण, दोघांच्या ब्रेकअपचे कारण काय होते, यावरून आता पर्दाफाश झाला आहे. उर्फी जावेदने एका मुलाखतीत सांगितले आहे की, पारससोबतच्या डेटिंगला ती रिलेशनशिप मानत नाही. पारससोबत असलेल्या नात्याचे वर्णन उर्फीने 'लहानपणी झालेली चूक' असे केले आहे.

'Anupamaa' फेम अभिनेत्यासोबत Urfi Javed चं अफेअर, पण...

उर्फी पुढे म्हणाली, 'ते नातं म्हणजे लहानपणी झालेली चूक होती. महिनाभरानंतरच मला त्याच्यासोबत ब्रेकअप करायचं होतं. तो फार पझेसिव्ह होता. त्याने माझ्या नावाचे तीन टॅटू त्याच्या शरीरावर काढले होते. ब्रेकअपनंतर त्याने मला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला. पण, नातं तुटल्यावर असं कोण करतं?' असा प्रश्न तिने उपस्थित केला. 

'त्याने संपूर्ण शरीरावर टॅटू काढले असते, तरी मी त्याच्याकडे पुन्हा गेली नसती. ब्रेकअपनंतर तो सतत मला फोन करायाचं पण मी कधी त्याच्या फोनला उत्तर दिलं नाही. त्यानंतर तो आता दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे...' असं देखील उर्फी म्हणाली.