बेबी बंपसोबत उर्मिला कोठारेचा खास ठुमका

मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे लवकरच बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Jan 3, 2018, 06:42 PM IST
बेबी बंपसोबत उर्मिला कोठारेचा खास ठुमका title=

मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे लवकरच बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहे. 

उर्मिलाने नुकताच नववर्षाच्या स्वागतासाठी असलेला एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. यात ती बेबी को बेस पसंद हे या गाण्यावर थिरकताना दिसत आहे.उर्मिलाने काही दिवसांपूर्वी तिचे डोहाळेजेवण दिमाखात साजरे केले होते. या तिच्या डोहाळे जेवणाला अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. 

आपण पाहतोय गरोदरपणातही उर्मिला सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. ती कायम आपल्या प्रोजेक्टचे तसेच खास फोटो शेअर करत असते. या अगोदर उर्मिलाने गरोदरपणात योगाचा किती फायदा होतो हे सांगणारा व्हिडिओ शेअर केला होता. 

तसेच ती आणि आदिनाथ या दिवसांत एका टूरवर गेले होते. ते फोटो देखील दोघांनी शेअर केले आहेत.  उर्मिला कायमच आपल्या अभिनयासोबतच नृत्याने सगळ्यांना आनंद देत असते. तिचा असाच एक डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला आहे. 

उर्मिला आणि आदिनाथ यांचे हे पहिले बाळ आहे. 20 डिसेंबर 2011 रोजी ही जोडी विवाहबद्ध झाली होती. लग्नाच्या 5 वर्षांनी उर्मिला आई होणार आहे.