Urvashi Rutela आणि Rishabh Pant च्या Hate Story मध्ये कोणा तिसऱ्याची एन्ट्री. Romantic Video मुळं एकच चर्चा

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच दरम्यान उर्वशी रौतेला या पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शहाच्या प्रेमात.

Updated: Sep 8, 2022, 05:45 PM IST
Urvashi Rutela आणि Rishabh Pant च्या Hate Story मध्ये कोणा तिसऱ्याची एन्ट्री. Romantic Video मुळं एकच चर्चा  title=

Naseem Shah:सध्याच्या घडीला क्रिकेटच्या जगतात बऱ्याच घडामोडी पाहायला मिळत आहेत. Asia Cup 2022 सुरु असल्यामुळे बऱ्याच खेळाडूंची नावेही चर्चेत आली आहेत. त्यातलेच एक नाव म्हणजे Naseem Shah.हे नाव सध्या सगळ्यांच्या माहितीचे झाले असेल. नुकत्याच पार पडलेल्या अफगणिस्ठान आणि पाकिस्तानची मॅच पाहिल्यावर क्रिकेटर नसीम शहाचे तुम्हीही FAN झाला असाल. (Pakistan) पाकिस्तानची टीम ही मॅच जिंकण्यामागे नसीम शहाचा मोठा हात होता. नसीम शहाने शेवटच्या ओवरला 2 SIXER मारुन टिमला विजय मिळवून दिला. अनेकांसाठी तर तो (hero) हिरो ठरला. Team India साठी मात्र तो खलनायक ठरला, कारण त्यानं एशिया कपच्या फायनलमध्ये पोहचण्यासाठीचे टीमचे सर्व मार्ग बंद केले.  

भारतात सध्या तो आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजे एक (Bollywood Actress) बॉलिवूड अभिनेत्री. हातात चित्रपट नसला तरीही चर्चांमध्ये मात्र सातत्यानं असणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव (Urvashi Rutela) उर्वशी रौतेला. अलीकडेच तिने इंन्सटग्रामला एक स्टोरीला शेअर केली होती. ज्यामध्ये पाकिस्तानी गोलंदाज Naseem Shah दिसत आहे. त्या व्हिडीओत (Urvashi Rutela) उर्वशी रौतेला स्टेडिअममध्ये क्रिकेट मॅच पाहताना दिसत आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी गोलंदाज Naseem Shah उर्वशीला स्क्रीन वर पाहताच लाजताना दिसतोय. बरं त्याला पाहून (Urvashi Rutela) उर्वशीसुद्धा लाजताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ (INDIA VS PAKISTAN) भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅच दरम्यानचा आहे. उर्वशीने हा व्हिडीओ शेअर करताच तो प्रचंड व्हायरल झाला. काही क्षणांतच त्यावरून असंख्य मीम्स साकारण्यात आले. बघता बघता उर्वशी मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली. पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेमात आहेस का, असे म्हणत अनेकांनीच तिच्यावर उपरोधिक टीकाही केली. सोशल मिडीयावरील हा गोंधळ लक्षात येताच तिने तो व्हिडीओ इंन्सटग्राम स्टोरी सेक्शनवरुन तातडीने काढून टाकला. पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता. कारण तोपर्यंत, व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायचा तो गोंधळ झालाच होता. 

मुख्य म्हणजे एकिकडे ऋषभ पंतमुळं चर्चेत असणाऱ्या उर्वशीचं नाव आता पाकिस्तानी क्रिकेटरशी जोडलं गेल्यामुळे आता तिच्या आयुष्यात पंतचा अंत झाला का, हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.