मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिस का म्हणाल्या...'मौत मुबारक हो'

मीना कुमारी आणि नरगिस अत्यंत चांगल्या मैत्रिणी होत्या...

Updated: Jun 20, 2021, 11:34 AM IST
मीना कुमारी यांच्या निधनानंतर नरगिस का म्हणाल्या...'मौत मुबारक हो'

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक किस्से आहेत, जे अद्यापही उलगडलेले नाहीत. इंडस्ट्रीचा एक प्रसिद्ध चेहरा म्हणजे अभिनेत्री मीना कुमारी.  'ट्रेजेडी क्वीन' म्हणून देखील त्यांची ओळख होती. त्यांच्या सौंदर्यावर आणि भोळ्या चेहऱ्य़ावर कित्येक जण फिदा होते. मीना कुमारी यांना त्यांच्या करियरमध्ये प्रचंड यश आणि प्रसिद्धी मिळाली. पण खासगी जीवनात मात्र त्यांना एकटंच रहावं लागलं. मीना यांनी स्क्रिनरायटर कमल अमरोही यांच्यासोबत लग्न केलं. पण हे लग्न फार काळ काही टिकू शकलं नाही. मीना आणि कमल काही दिवसांतचं विभक्त झाले. 

घटस्फोटानंतर मीना अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रेमात पडल्या. पण कालांतराने हे नातं दिखेल तुटलं.  मीना यांना खासगी आयुष्याचं सुख कधीचं  मिळालं नाही. अखेर त्या ऐकट्याचं राहिल्या. त्यांच्या वाट्याला फक्त धोका आणि फसवणूकचं आली. मीना कुमारी यांनी त्यांच्या कार्यकाळात 92 चित्रपटांमध्ये काम केलं. पण प्रसिद्धी पाहाण्यासाठी त्या राहिल्या नाहीत. 

वयाच्या 38व्या वर्षा त्यांनी अखेरचा श्वास घेत या जगाचा निरोप घेतला. 31 मार्च1972 साली त्यांच्या मृत्यू झाला. कोमामध्ये गेल्यानंतर दोन दिवसांमध्ये त्यांचं निधन झालं. तेव्हा त्यांची आणि नरगिस यांची घट्ट मैत्री होती. नरगिस त्यांच्या मैत्रिणीच्या अंत्यसंस्कारासाठी देखील गेल्या. तेव्हा त्यांनी केलेलं वक्तव्य फार चर्चेत आलं. त्या म्हणाल्या, 'मीना कुमारी, मौत मुबारक हो...'

नरगिस यांचं हे वक्तव्य चर्चेत राहिलं. एका मुलाखतीत त्यांना याचा खुलासा देखील केला, त्या म्हणाल्या, 'मीना कुमारी, मौत मुबारक हो... असं मी आधी कधीही म्हणाली नाही. मीना आज तुमची ही मोठी बहिण म्हणते, तुम्हाला तुमच्या मृत्यूबद्दल शुभेच्छा देते आणि या जगात पुन्हा न येण्यासाठी विनंती करते. कारण तुमच्यासारख्या लोकांसाठी ही जागा चांगली नाही.' 

पुढे नरगिस म्हणाल्या, 'मी स्वतः मीना कुमारी यांच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज ऐकला. कमल त्यांना मारहाण करायचे. त्यानंतर मीना आणि कमल विभक्त झालं. आयुष्यात आलेल्या कठिण प्रसंगांमुळे त्या दारूच्या अहारी गेल्या. त्यांना रूग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.' अखेर संकटांचा सामना केल्यानंतर मीना कुमारी यांचं निधन झालं.