रणबीर कपूरच्या प्रेमामुळे आलिया सिनेमातील करिअर सोडणार का?

काय होणार आलियाचं 

रणबीर कपूरच्या प्रेमामुळे आलिया सिनेमातील करिअर सोडणार का?

मुंबई : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा आहे. सोशल मीडियावर अशी माहिती आहे की, हे दोघं आता आपल्या प्रेमाच्या पुढे गेले असून लवकरच लग्न करणार आहेत. याचकारणामुळे आलिया अनेकदा रणबीरच्या कुटुंबासोबत अनेकदा दिसली आहे. मात्र तिच्या या नव्या नात्यामुळे फिल्मी जगतात नव्याने येत असलेल्या अभिनेत्रीला आपलं प्रगतीवर असलेलं करिअर सोडणार आहे. 

कपूर कुटुंबात अशी प्रथा आहे की, सुनांना लग्नानंतर त्यांच करिअर थांबबाव लागतं. आणि हीच या कुटुंबाची प्रथा आहे. याचमुळे रणधीर कपूर यांची पत्नी बबीता, ऋषी कपूर यांची पत्नी नीतू सिंह या दोघींनी देखील लग्नानंतर आपलं करिअर थांबवलं. याचमुळे आता रणबीरशी लग्न करून आलिया देखील आपलं करिअर थांबवणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

काही मीडियामध्ये अशी माहिती आहे की, आलिया लग्नानंतर आपलं फिल्मी करिअर सुरूच ठेवणार आहे. कारण बॉलिवूडचे शोमॅन राजकपूरचे भाऊ शशी कपूर यांची पत्नी जेनिफर आणि शम्मी कपूर यांची पत्नी गीता बालीने देखील आपलं करिअर सुरूच ठेवलं आहे.