मुंबई : फक्त बेभान होऊन आयुष्य जगणारी ती तरुणाई हा समज पूर्णपणे खोडून काढत समाजात अनेक तरुण असे काम करत आहेत की त्यामुळे आपण प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत आहोत. अशा कृतिशील तरूणाईच्या शिरपेचात झी युवाने युवा सन्मान पुरस्कारांचा तुरा खोवला आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अनुकरणीय कार्य करणाऱ्या युवकांना ‘झी युवा सन्मान’ पुरस्कार जाहीर झालेआहेत. हा कार्यक्रम झी युवावर शनिवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता दाखवण्यात येईल. या पुरस्कार सोहळ्यात युवा नेतृत्व हा सन्मान रोहित पवार यांना देण्यात आला.
राजकारणापेक्षा समाजकारणाचं बाळकडू रोहित यांना मिळालं ते आपल्याआजोबांकडून अर्थात शरदचंद्रजी पवार यांच्याकडून. महाराष्ट्राच्या राजकारणाला रोहित यांनी अक्षरशः वाहून घेतलं. म्हणूनच मुंबईसारख्या शहरात शिक्षण पूर्ण करून गावाला येऊन शेताच्या बांधावरची माती त्यांनी कपाळाला लावली आणि अवघ्या २१व्या वर्षी बारामती ॲग्रोच्या मुख्य कार्यकारी संचालकपदाची सूत्रे समर्थपणे हाती घेतलीत आणि २०१७मध्ये तळागाळातील लोकांचे प्रश्न समजून त्यांची उत्तरे शोधावी यासाठी शिरसुफळ गुळवडी मधून जिल्हा परिषदेची निवडणूक यशस्वीपणे लढवली.
डिजिटल स्कूल, नोकरी महोत्सव, जलसंधारण असे अभिनव उपक्रम करत करत विविध क्षेत्रातील युवक-युवतींची प्रतिभा आणखी प्रबळ करण्यासाठी कबड्डी स्मॅश, नाट्य, कुस्ती अशा विविध स्पर्धांचे रोहित यांनी आयोजन केलं आणि आपल्या संस्कृतीची जाणीव नव्या पिढीला व्हावी म्हणून भजन स्पर्धा ही आयोजित केली. राजकारणात लोकप्रियता जिकती महत्त्वाची तितकीच लोकमान्यता ही आणि हि लोकमान्यता रोहित यांना त्यांच्या कार्याने मिळवून दिली.
रोहित यांच्या खंबीर नेतृत्वाचं यथासांग दर्शन घडले ते करोनाच्या काळात. ज्याची सुरवात झाली ती सॅनिटायझर्सची कमतरता भासत असताना फक्त आपल्या मतदार संघात नाही तर राज्यभरात ५०००० लिटर पेक्षा सॅनिटायझर्स पुरवठा रोहित यांनी केला. तर मतदार संघात अत्याधुनिक कोव्हिड सेंटर्सची उभारणी केली. १ लाख ४८००० शेतकऱ्यांना त्यांचा विमा मिळवून दिला. मुंबईत डबेवाले, रिक्षा टॅक्सी वाले ह्यांना आपण मोफत मास्कच वाटप केलं. रोहित यांचं नेतृत्व फक्त घोषणांचं आणि भाषणांचं नसून त्यात बेधडक कार्यपूर्ती सातत्याने दिसून आली आहे.
उद्याचा महाराष्ट्र येणारी तरूण पिढी आपल्या पावलावर पाऊल ठेवून पवारबाज आणि पॉवरबाज प्रगती करेल ह्यात शंकाच नाही. अशा या धडाडीच्या व्यक्तिमत्वाला झी युवा नेतृत्व सन्मानने गौरवण्यात येणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका झी युवा सन्मान रविवार १४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता झी युवावर.