ऑफिसमध्ये खादाडखाऊपणा करा कमी, नाहीतर होईल मोठं नुकसान!

जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात असाल तर सावधान. हे सततचं खाणं पडू शकतं तुम्हाला महागात.

Updated: Dec 2, 2017, 04:11 PM IST
ऑफिसमध्ये खादाडखाऊपणा करा कमी, नाहीतर होईल मोठं नुकसान! title=

मुंबई : जर तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा ऑफिसमध्ये थोड्या थोड्या वेळाने काही ना काही खात असाल तर सावधान. हे सततचं खाणं पडू शकतं तुम्हाला महागात.

डच ऑर्गॅनिक फूड मेकर कॅलो द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेत एक धक्कादायक खुलासा झालाय. यातून समोर आलंय की, ज्या महिला ऑफिसमध्ये हलकं पण काही ना काही सतत खात राहतात, त्या प्रत्येक वर्षी साधारण एक लाख कॅलरीज अतिरीक्त ऊर्जेचा उपभोग करतात. रिपोर्टनुसार, हे जवळपास ५० दिवसांच्या खाण्याच्या कॅलरीच्या बरोबरीत आहे. 

चॉकलेटचे बिस्किट

या सर्व्हेवर आहार विशेषज्ञ म्हणतात की, प्रत्येक दिवशी ५०० अतिरीक्त ऊर्जेची खपत आठवड्यात अर्धा किलो वजन वाढण्याचं कारण होऊ शकते. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या काही गोष्टी महिलांनी ऑफिसमध्ये खाऊ नये. जसे की, बिस्कीट. बिस्कीट खाणे भलेही चांगले वाटत असेल पण एका चॉकलेट बिस्कीटमध्ये १०० कॅलरी ऊर्जा आणि ३-३ ग्रॅम फॅट आढळतं.  

मिल्की कॉफी 

रोज जर तुम्ही ब्लॅक कॉफी किंवा चहापेक्षा वेगळी मिल्की कॉफी घेत असाल तर एका छोट्या कपात कमीत कमी ८०-१०० कॅलरी ऊर्जा असते आणि याची तुलना एक दिवसाच्याअ अतिरीक्त जेवणाच्या बरोबरीत केली जाऊ शकते. जर तुम्ही दिवसातून दोन-तीन मिल्की कॉफी पित असाल तर तुमचं वजन वाढू शकतं.

एक साधा केक 

केकचं नाव ऎकताच तोंडाला पाणी सुटतं. पण काय तुम्हाला माहिती आहे की, एका केकमध्ये १०-१२ ग्रॅम फॅट आणि ३०० ते ४०० कॅलरी ऊर्जा असते. जर तुम्ही ऑफिसमध्ये केक खात असाल तर तुमचं वजन वाढू शकतं. 

ड्रायफ्रुट्स

काही महिला थोड्या थोड्या वेळाने खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स आपल्या सोबत ठेवतात. ड्रायफ्रुट्स किंवा नट्समध्ये १०० कॅलरी असतात. इतक्या कॅलरी रोज मिळणे शरिरासाठी हानिकारक आहे. जर थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स तुम्ही खाल तर वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.