तुमच्याही डोळ्यातून पाणी येतं का? मग त्या मागे असू शकतात 'ही' कारणं

डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो.

Updated: May 4, 2022, 07:31 PM IST
तुमच्याही डोळ्यातून पाणी येतं का? मग त्या मागे असू शकतात 'ही' कारणं title=

मुंबई : डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा भाग आहे. परंतु आपण त्याची काळजी घेण्याकडे नेहमीच दुर्लक्ष करतो. डोळांची काळजी घेणं हे फार महत्वाचं आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच लोकांना हे माहित नसतं. बदलती जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे बहुतेक लोकांना वेळेआधीच चष्मा लागतो. इतकंच नाही तर लोकांना सुरुवातीला डोळ्यात पाणी येण्याची, डोळे लाल किंवा कोरडी होण्याची तक्रार जाणवते.

परंतु अनेक लोक त्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. ऐवढेच नाही तर पुढे जाऊन याचे गंभीर परिणाम देखील उद्भवू शकतात.

चला तर मग जाणून घेऊया तुमच्या डोळ्यातून पाणी का येतं आणि त्यावर काय उपचार आहेत.

या सामान्य कारणांमुळेही डोळ्यात पाणी येतं

कधीकधी डोळ्यांत पाणी येण्याचे कारण सामान्य असते. खर तर डोळ्यांत धूळ किंवा कचरा गेला की, डोळ्यातून पाणी येते. त्याचबरोबर कोणीतरी कांदा कापत असल्यामुळे देखील कारणीभूत आहे, परंतु हे पाणी थांबत नसेल, तर ते एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते.

डोळ्यांच्या बुबुळावर परिणाम

कधीकधी डोळ्यांत पाणी येण्याचे कारण डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारी जळजळ असू शकते. वास्तविक, हा त्रास एका डोळ्यापासून सुरू होतो आणि दोन्ही डोळ्यांना होऊ शकतो.

आम्ही तुम्हाला सांगतो की, या समस्येचे दोन प्रकार आहेत, एक ऍलर्जी आणि दुसरी व्हायरस. जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर यासाठी थेंब आणि कोल्ड कॉम्प्रेस हे उत्तम उपाय आहेत, परंतु जर त्यामागे व्हायरस कारणीभूत असेल, तर तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांना भेट द्यावी लागेल..

कॉन्टॅक्ट लेन्स देखील कारणीभूत असू शकतात

काहीवेळा कॉन्ट्रॅक्ट लेन्स दीर्घकाळ धारण केल्यानेही डोळ्यांत पाणी येते. लेन्स घातल्या तर डोळ्यांत पाणी येण्याबरोबरच जळजळ आणि इतर समस्याही उद्भवू शकतात.

तुम्हाला जर अशी समस्या उद्भवत असेल, तर तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी थंड पाण्याने डोळे स्वच्छ करावे लागतील. यासोबतच शक्य असल्यास रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यात गुलाबपाणी टाका. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.