'हे' आहेत खजूर खाण्याचे फायदे...

 खजूर आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 26, 2017, 11:47 AM IST
'हे' आहेत खजूर खाण्याचे फायदे... title=

मुंबई : खजूर आरोग्यदायी असण्याबरोबरच सौंदर्यवर्धक देखील आहे. खजूर रोज खाल्याने त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते. त्यामुळे तुमच्या दैनंदिन आहारात याचा अवश्य समावेश करा. जाणून घेऊया रोज खजूर खाण्याचे फायदे...

  • खजूर खाल्याने शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात. त्यामुळे चेहऱ्यावर चमकदारपणा येतो.
  • यात असलेल्या पेंटोथेनिक अॅसिडमुळे मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरील चमक वाढते.
  • खजूरमध्ये असलेल्या व्हिटॉमिन सी मुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि सुरकुत्यांपासून त्वचा सुरक्षित राहते.
  • खजूरात असलेल्या व्हिटॉमिन बी मुळे पिंपल्स, अॅक्ने आणि स्ट्रेच मार्क्स दूर होतात.
  • खजूरात झिंक असल्याने रोज खजूर खाल्याने केस काळे आणि दाट होतात.
  • खजूरात लोह अधिक असते. यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि केसगळतीची समस्या दूर होण्यास मदत होते.
  • यात असलेल्या अॅंटीऑक्सिंडेंट्समुळे फ्री रॅडिकल्सचा परिणाम कमी होतो. यामुळे वाढत्या वयातही सौंदर्य टिकून राहण्यास मदत होते.