मुंबई : भुईमुगाच्या शेंगा उकडून, मीठ घालून खूप छान लागतात. चौपाटीवर फिरायला गेल्यावरही शेंगा विकणारी मंडळी तुम्हाला भेटतील. अगदी सहज उपलब्ध असणाऱ्या या भुईमुगाच्या शेंगांमध्ये पौष्टीक घटकांचा खजिना आहे. याला स्वस्त बदाम असेही म्हणतात. कारण बदामात असणारे पोषकतत्त्व यातही आढळतात.
# भुईमुगाच्या शेंगांना आपली अशी विशिष्ट चव असते. गोड असल्या तरी या शेंगा स्वास्थ्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. अनेक लोक तर या चवीसाठी खातात. पण याचे फायदे समजल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
# भुईमुगाच्या शेंगांमध्ये आयर्न, कॅल्शियम, झिंक आणि प्रोटीन असते. जे शारीरिक वृद्धीसाठी खूप आवश्यक असते. जर तुम्हाला दूध प्यायला आवडत नसेल किंवा काही कारणास्वत तुम्ही ते पिऊ शकत नसाल तर भुईमुगाच्या शेंगा खाणे हा अतिशय उत्तम पर्याय आहे.
# ओमेगा ६ ने परिपूर्ण असल्याने त्वचा कोमल, मुलायम राहते. अनेक लोक शेंगांची पेस्ट बनवून फेस पॅक म्हणून वापरतात.
# पोटांच्या समस्यांवर आराम मिळण्यासाठी देखील भुईमुगाच्या शेंगा उपयुक्त ठरतात. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
# भुईमुगाच्या शेंगा खोकल्यावरही फायदेशीर ठरतात. नियमित खाल्याने फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.
# भुईमुगाच्या शेंगा खाल्याने शरीराला ताकद मिळते. याशिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
# गर्भवती महिलांसाठीही भुईमुगाच्या शेंगा खाणे, फायदेशीर ठरते. गर्भातील बाळाच्या विकासाठी याचा फायदा होतो.
# यात कॅल्शियम आणि व्हिटॉमिन डी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हाडांना बळकटी येते.
# भुईमुगाच्या शेंगा खाल्याने हृदयासंबंधित आजार कमी होण्यास मदत होते.
# शेंगा नियमित खाल्याने रक्ताची कमतरता निर्माण होत नाही.
# वाढत्या वयाच्या लक्षणांना आळा घालण्यासाठी भुईमुगाच्या शेंगांचे सेवन करा. यातील अॅंटी ऑक्सीडेंट फाईन लाईन्स, सुरकुत्या दूर यांना प्रतिबंध करतात.