मुंबई : प्रत्येक लोकांनी चांगल्या आरोग्यासाठी दिवसाला एक तरी फळ खावं असे डॉक्टर सांगतात. यासगळ्यात सफरचंद खाण्यासाठी डॉक्टर सांगतात. तुम्ही हे देखील ऐकलं असेल की, दररोज एक सफरचंद खाल्ला तर तुम्हाला कधीही डॉक्टरकडे जाण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे नेहमी नाही जमत नसलं, तरी लोकं सफरचंद खातात. परंतु सफरचंद खाण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहितीय का? आता तुम्ही म्हणाल की, यात कोणती आली पद्धत?
अनेक लोकांना साल सोलून सफरचंद खाण्याची सवय असते. असं सफरचंद खाल्याने ते चवीला लागते. असे अनेक लोकांचे म्हणणे आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते साल काढलेले सफरचंद खाऊ नये. सफरचंदाच्या सालीमध्ये असे अनेक पोषक तत्व असतात जे आरोग्याच्या समस्या दूर करतात. सफरचंदाचे सालीसोबत सेवन करणे अधिक फायदेशीर ठरेल.
सफरचंदांमध्ये प्रथिने, चरबी, फायबर, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, लोह, साखर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम, जस्त, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई सारखे अनेक पोषक घटक असतात. या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ते सालीसोबत खाल.
सफरचंद दुधासोबत खाल्ल्याने अनेक फायदे आहेत. नाश्त्यात सफरचंद दुधासोबत खा. यामुळे पोटाशी संबंधित समस्या दूर होतील.
सफरचंदातील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर रिकाम्या पोटी सफरचंद खा. रात्री सफरचंद खाऊ नका. सफरचंदात कॅफिन आढळते. याचा झोपेवर नकारात्मक परिणाम होतो. दिवसातून एक सफरचंद किंवा अर्धे सफरचंद खा. परंतु त्यापेक्षा जास्त त्याला खाऊ नका. जास्त प्रमाणात सफरचंद खाल्ल्याने घसा, जीभ, ओठ आणि चेहऱ्याला सूज येऊ शकते.
सफरचंद धुतल्याशिवाय खाऊ नका. कधीकधी सफरचंद चमकण्यासाठी ब्लीचचा किंवा वॅक्सचा वापर केला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही सफरचंद न धुता खाल्ल्यास नुकसान होऊ शकते. यासाठी तुम्ही सफरचंद 30 मिनिटे कोमट पाण्यात ठेवा.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.)