symptoms of diabetes news in marathi : चुकीची जीवनशैली आणि बैठी काम यामुळे आपण अनेक आजरांचे बळी होतो. त्यातच आजकाल मधुमेहाची समस्या खूपच सामान्य झाली आहे. जगभरातील अनेक लोक टाइप-2 मधुमेहाने त्रस्त आहेत. त्याचप्रमाणे मधुमेहाची अनेक लक्षणे दिसतात. पण तुम्हाला माहितीय तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या रोजच्या सवयीमधून काही लक्षणे दिसून येतात. जर तुम्ही गाढ झोपेत असाल अन् मध्यरात्री तुम्हाला अचानक जाग येत असाल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका. कारण ही लक्षणं मधुमेहाची असू शकतात. तसेच मधुमेह असेल तर वेळीच सावध झालेले तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल.
जेव्हा शरीरात पुरेसे इन्सुलिन तयार होत नाही तेव्हा मधुमेह होतो. मधुमेहाचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक प्रकार 1 आणि दुसरा प्रकार 2 मधुमेह. मधुमेह हा असा आजार आहे की केवळ वृद्धांनाच होतो अस नाही. मधुमेह असलेल्या लोकांमध्ये झपाट्याने लक्षणे दिसू लागतात. जसे की रात्रीच्या वेळी वारंवारं उठणे म्हणजे ही मधुमेहाच गंभीर लक्षण असू शकतं.
मधुमेह असलेल्या लोकांना झोपेची समस्या असू शकते. हे विविध कारणांमुळे असू शकते. ज्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी (नर्व्हचे नुकसान), पुन्हा लघवी येणे आणि स्लीप एपनीयामुळे होणारी वेदना यांचा समावेश आहे.
रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे त्वचा कोरडी आणि खाज सुटते. रात्रीच्या वेळी समस्या वाढू शकते. यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वारंवार लघुशंकेला गेल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण देखील कमी होते. अशावेळी रात्रीचं झोपेत असताना वारंवार तहान लागत असते. परिणामी मधुमेह रुग्ण बऱ्याच वेळ जागीच असतात.
मधुमेहाच्या रुग्णांना रात्री घामाचा त्रास होऊ शकतो. रात्री झोपसोबत इतर लक्षणे देखील दिसू लागतात. यामध्ये थरथरणे, हृदयाचे ठोके वाढू लागतात.
ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार असेल तर गाढ झोपेत वारंवारं लघुशंका येत असते. जास्ती करुन हा त्रास मधुमेह रुग्णांना होत असतो. यामागील कारण म्हणजे शरीर अतिरिक्त ग्लुकोजपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे.