पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका?

पावसामुळे उष्णतेपासून आपली सुटका होते. परंतु त्यासोबतच आजारांनाही निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात खान्यात काही गोष्टी टाळता येण्याजोग्या असतील तर काही समस्या उद्धभवणार नाहीत. त्यामुळे आरोग्याशी निगडीत प्रत्येक समस्यातून तुम्ही मुक्त राहू शकता.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 14, 2018, 10:44 PM IST
पावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका? title=

मुंबई :  सध्या देशात सर्वत्र पाऊस पडत आहे. वातावरणात गारवा आहे. तसेच निसर्गाचे वातावरण आल्हादायक आहे. पावसामुळे वातावरण दमट राहते. पावसाचे थेंब केवळ गर्मीतून सुटका करत असले तरी काही आजारांना निमंत्रण देणारे असतात. पावसाळ्यात खान्यात थोडी तरी ढिलाई केली तर ती आरोग्याला घातक ठरते.

diet in monsoon

पावसाळ्यात आपली पचन क्रिया खूप कमजोर होते. त्यामुळे पचन क्रिया कमजोर असेल तर खल्लेले पचन्यास  जड जाते. त्यामुळे आरोग्याचे काही प्रश्न निर्माण होतात. या कारणामुळे आपल्या आहारात बटाटा, कणिक, भेंडी, फुलकोबी यांना स्थान देऊ नका.

diet in monsoon

पावसाळ्याच्या सिजनमध्ये घरामध्ये पालकचे पकोडे किंवा पालकचे पराठे बनविले जातात. पत्ता कोबीचाही वापर केला जातो. मात्र, पानाच्या भाज्यांमध्ये छोटे छोटे किडे असतात. त्यामुळे अशा भाज्या खाने आरोग्यासाठी हानिकारक असते.

diet in monsoon

भारतात पावसाळ्याच्या दिवसात मशरुमची भाजी अनेक लोक खान्यासाठी पसंत करतात. काही वेळा पकोडेही तयार केले जातात. मात्र, मशरुम खाण्यामुळे इंफेक्शनचा धोका जास्त असतो. त्यामुळे मशरुम खाणे टाळावे.

diet in monsoon

हिरवी काकडी आरोग्यासाठी चांगली असते. गर्मीमध्ये काकडीची कोशिंबीर खाल्ली जाते. सलाड म्हणून याचा उपयोग केला जातो. मात्र, पावसाळ्याच्या हंगामात काकडीमध्ये बारीक किडे असण्याची जास्त शकता असते.

diet in monsoon

घरात खाण्यापेक्षा पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्यावर आपण भर देतो. जंक फूड पावसाळ्यात आरोग्यासाठी धोकादायक असते. त्यामुळे तेलकट, तिखट पदार्थ टाळा. अन्यथा पावसाळ्यात यामुळे आरोग्य बिघडण्याचा जास्त धोका असतो.