मधुमेहींनो! ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी असा करा भेंडीचा प्रयोग...

भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. 

Updated: May 23, 2018, 12:31 PM IST
मधुमेहींनो! ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यासाठी असा करा भेंडीचा प्रयोग... title=

मुंबई : भारत ही मधुमेहाची राजधानी आहे. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी महागडी औषधे घेतली जातात. पण तुम्हाला माहित आहे का? मधुमेहावर भेंडी अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. पहा मधुमेह नियंत्रित करण्यासाठी भेंडीचा कसा वापर कराल...

असा करा भेंडीचा उपयोग

कच्ची भेंडी खाल्याने मधुमेह नियंत्रित राहतो. यातील फायबर्स मधुमेहींसाठी उत्तम मानले जाते. भेंडी घ्या आणि त्याची दोन्ही टोके कापा. त्यातून एक चिकट पदार्थ बाहेर येईल. रात्री झोपण्यापूर्वी भेंडी पाण्याच्या ग्लासात ठेवा आणि त्यावर झाकण ठेवा. सकाळी उठल्यावर पाण्यातून भेंडी बाहेर काढा आणि ते पाणी प्या. त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रित राहील. असे नियमित काही महिने करा. 

फायदे

  • टाईप २ डायबेटिस झाल्याने किडनीवर परिणाम होतो. भेंडी खाल्याने किडनीची समस्या दूर होते. त्यातच जर मधुमेह असेल तर भेंडी खाणे फायदेशीर ठरेल.
  • मधुमेहींना लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. तर त्यासाठी भेंडी हा एक उत्तम पर्याय आहे. भेंडीत फक्त २०% ग्लायसेमिक इंडेक्स असते. जे खूप कमी आहे.