Water Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!

Health News: ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते.  या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात.

Updated: Feb 7, 2023, 08:50 PM IST
Water Chestnut Benefits : 'या' पिठाच्या भाकऱ्या खा अन् कोलेस्ट्रॉल आणि शुगरला पळून लावा!
Water Chestnut Benefits

Water Chestnut Benefits : सध्या थंडीचे दिवस सरत आलेले आहेत. त्याचबरोबर सर्दी, तापाच्या रुग्णांत वाढ (Health News) होत आहे. त्यामुळे हिवाळ्यात (winter) ठणठणीत राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. काही पदार्थांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल (cholesterol) झपाट्याने वाढते. कोलेस्ट्रॉल वाढल्याने अनेक आजारांचा धोकाही वाढतो. महाराष्ट्रात ज्वारीची भाकर, तांदळाची भाकर आणि बाजरीची भाकर खाल्ली जाते. त्याचा फायदा शरिराला होतो. त्याचबरोबर तोटा देखील होतो.

कोलेस्ट्रॉल  (cholesterol) आणि मधुमेहाचा (sugar) त्रास आहे अशा लोकांसाठी त्यांचा ब्लड शुगर लेवल (Blood sugar levels) नियंत्रित राहणं गरजेचं असते. ज्या लोकांना कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाचा त्रास जाणवतो त्यांनी तांबूस पिठाच्या पाण्यात बनवलेल्या बनवलेला भाकरी खाल्ल्या पाहिजे.  

तांबूस पिठाच्या पाण्यात बनवलेल्या बनवलेला भाकरी खाल्ल्या तर कार्बोहायड्रेट, प्रोटीन व्हिटॅमिन ,मॅग्नेशियम ,पोटॅशियम फायबर इत्यादी पोषक तत्व यातून मिळतं. त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहारपासून सुटका होते. तांबूस पिठाला सिंघाडाच्या पिठ देखील म्हणतात. या त्यामुळे तुमचं वजन नियंत्रित  (Weight controlled) राहतं. फायबर युक्त पदार्थ (fiber-containing food) खाल्ल्याने तुम्हाला सारखी सारखी भूक लागत नाही.

आणखी वाचा - Cholesterol in Chicken: चिकन खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतो का? जाणून घ्या यावर आरोग्यदायी उपाय

दरम्यान, ताणतणावापासून (Tension Free) लांब राहण्यास देखील मदत होते.  या पिठाची भाकर खाल्ल्याने पचन क्रिया देखील चांगली राहते. मधुमेह रुग्णांनी याचा समावेश आपल्या आहारात करून ब्लड शुगर लेवल नियंत्रणात आणू शकतात. त्यांच्यासाठी हे पीठ संजिवनीपेक्षा कमी नाही.

जंक फूड (Junk food) शरीरासाठी खूप हानिकारक आहे. याच्या सेवनामुळे लठ्ठपणा वाढण्याबरोबरच कोलेस्ट्रॉलची पातळीही झपाट्याने वाढते. नेहमी घरी बनवलेल्या डाळी किंवा भाज्या फक्त मोहरी किंवा तिळाच्या तेलात तळून घ्याव्यात. आपल्या आहारात ड्रमस्टिक सूप, कढीपत्ता, लसूण आणि कांदे यांचा समावेश करा. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)