Healthy Rotis for Weight Loss : आजच्या काळात इथे प्रत्येक जण आपल्या आरोग्यासाठी जागृत झाले आहेत. आपण कायम फिट दिसावं आणि आपलं वजन नियंत्रणात राहावं असं प्रत्येकाची इच्छा असते. पण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जीवनशैली आणि शारीरिक हालचालींचा अभावामुळे वजन वाढीची समस्येने असंख्य लोक त्रस्त आहेत. वाढत्या वजनावर नियंत्रण न ठेवल्यास गंभीर आजाराचा सामना करावा लागतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (Weight Loss Diet These 3 types of chapattis will cause weight gain to break quickly It will help to melt belly fat)
आज आम्ही तुम्हाला वजन नियंत्रित करण्याचा सर्वात सोपा मार्ग सांगणार आहोत. पण त्यासोबतच तुम्हाला जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागणार आहे. तसंच शारीरिक हालचालीसाठी वर्कआउट्स करणे गरजेचे आहे. वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात 'या' 3 प्रकारच्या चपात्याचा समावेश करा.
नाचणीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. अशा स्थितीत त्याच्या सेवनाने वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. नाचणी हे ग्लुटेन-मुक्त धान्य असून त्यात साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर असल्याने पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात नाचणीच्या 2 चपात्या किंवा भाकरी खाल्ल्यास जास्त वेळ भूक लागत नाही. त्यामुळे जास्तीचे खाणे टाळलं जातं.
वाढते वजन कमी करण्यासाठी बाजरी खूप प्रभावी मानली जाते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या वजन कमी करण्यासाठी बाजरीच्या भाकऱ्या खाऊ शकता. यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात, जे तुम्हाला लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतं. याशिवाय यामध्ये असलेले फायबर पचनसंस्था सुधारते आणि त्यामुळे दीर्घकाळ भूक लागत नाही.
नाचणी आणि बाजरीप्रमाणेच ज्वारीही वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करते. ज्वारीमध्ये इतर धान्यांपेक्षा जास्त फायबरदेखील असतं, जे वजन कमी करण्यास मदत करतं. याशिवाय ज्वारीचे सेवन केल्याने चयापचय गती कमी होते, जे वजन कमी करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतं. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या चपातीच आहारात समावेश नक्की करा.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.