close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

डायरियाचा त्रास असताना आहार कसा असावा?

नाशिकमध्ये डायरिया म्हणजेच अतिसाराच्या साथीने थैमान घातले आहे.

Updated: Jul 12, 2018, 06:23 PM IST
डायरियाचा त्रास असताना आहार कसा असावा?

मुंबई : नाशिकमध्ये डायरिया म्हणजेच अतिसाराच्या साथीने थैमान घातले आहे. या आजाराची आठ्वड्याभरात 200 जणांना लागण झाली आहे. तर या आजाराने पाच नाशिककरांचा बळी घेतला आहे. पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाणी, पदार्थाच्या सेवनामुळे अतिसाराचा त्रास होतो. यामध्ये शरीरातून पाण्याचा अंश झपाट्याने कमी होतो. परिणामी डीहायड्रेशनचा त्रास वाढतो. त्यामुळे काही सुरूवातीच्या टप्प्यात घरगुती उपायांनी आणि त्रास वाढला असल्यास वेळीच वैद्यकीय उपचारांच्या मदतीने हा त्रास कमी करता येऊ शकतो. मग औषधोपचारांच्या सोबतीनेच आहार नेमका कसा असावा? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर हा एक्सपर्ट सल्ला नक्की जाणून घ्या.  

ब्रेकफास्ट –

डायरियाचा त्रास होत असल्यास मसालेदार जेवण टाळा. कमी मीठ आणि मसाल्याचा हलका आहार घेतल्याने डायरियाचा त्रास कमी करण्यास तसेच आवश्यक न्युट्रिएंट्स मिळण्यास मदत होते. हलकेच भाजलेला ब्रेड आणि केळ सकाळच्या नाश्त्याला घ्यावे. डायरियाचा त्रास होत असताना गव्हाचा पाव / ब्रेड खाणे टाळा. त्यामधील फायबर पचायला जड असतात. मात्र केळ्यामधील पोटॅशियम घटक शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते.

मिड- मॉर्निंग स्नॅक –

या वेळेस ग्लासभर ताक प्यावे. दह्यामधील चांगले बॅक्टेरिया पचन सुधारण्यास मदत करतात. यामुळे शौचाला सुलभ  होण्यास मदत होते. यामुळे आतड्यांचे कार्य सुधारते.

दुपारचे जेवण –

या जेवणातही हलके आणि कमीत कमी फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. वाफवलेले बटाटे किंवा मऊ ताजा पांढरा भात खावा. भातासोबत दूधीची भाजी खाऊ शकता. दही आवडत असेल तर दुपारच्या जेवणात दही भात खावा. दह्यातील चांगले बॅक्टेरिया पोटातील अ‍ॅसिडीटी कमी करून डायरियाचा त्रास कमी करण्यास मदत करतात.

संध्याकाळचा नाश्ता –

डायरियाचा त्रास होत असल्यास संत्र खावे. यामुळे पचन सुधारते सोबतच पोटाला शांत ठेवण्यास मदत होते.

रात्रीचे जेवण –

रात्री हलके फुलके जेवण म्हणजे क्लिअर सूप ! सूपऐवजी डाळ-भात किंवा मऊ खिचडी खाऊ शकता. डाळींमध्ये फायबर घटक मुबलक असतात मात्र मूग डाळ पचायला हलकी असते. डायरियाचा त्रास कमी होईपर्यंत हलके आणि नियमित जेवतापेक्षा त्यापेक्षा कमी जेवावे. नक्की वाचा : अतिसार/डायरियावर 7 घरगुती उपाय