World Health Day । कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा

 World Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस.  जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.

Updated: Apr 7, 2021, 11:51 AM IST
World Health Day । कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा
संग्रहित फोटो

मुंबई :  World Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस.  जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. काही ठिकाणी कोरोनाची तिसरी लाटही आली आहे. अनेक देशांत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. आज जास्त धोका कोरोनाचा आहे. मात्र, असे असले तरी इतर आजार असल्यांनीही काळजी घेण्याची गरज आहे.  इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जर कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.

कोरोनाव्हायरस तसेच इतर संसर्गामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू नये याकरिता इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी दर तीन महिन्यांनी नियमित आरोग्य तपासणी करुन घेतली पाहिजे.  डॉक्टरांनी अशा व्यक्तींना आवाहन करत स्वत:च्या आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष न करण्याचा  सल्ला दिला आहे.  इतकेच नव्हे तर अशा व्यक्तींनी संतुलित आहाराचे सेवन करणे,  नियमित व्यायामासह तणावमुक्त आणि आरोग्यदायी जीवनशैली स्विकारणे गरजेचे आहे, असे जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी यांनी  म्हटले आहे.

शारिरीक आणि मानसिक अशाप्रकारच्या अनेक कोमॉर्बिडिटीज असलेले लोक अॅलर्जी आणि संसर्गाशी लढण्यास सर्वसामान्यांइतके सक्षम नसतात. निरोगी लोकांच्या तुलनेत या व्यक्ती अनेक आजारांनी वेढलेले असतात. भारत सरकारने कोविड-19 संसर्गाचा प्रसार रोखण्याकरिता करण्यासाठी राष्ट्रव्यापी लॉकडाऊन आणि कडक नियमावली जाहीर केली आहे. ज्यामध्ये मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सचे पालन करणे, हातांची स्वच्छता राखणे यासारख्या उपाययोजना केल्या आहेत.

मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयाची समस्या, मूत्रपिंडाचा रोग आणि तीव्र अडथळा आणणारा फुफ्फुसीय रोग (सीओपीडी) यासारख्या वृद्ध व्यक्ती आणि प्रौढ व्यक्तींमध्ये कोविड संसर्गाचा धोका जास्त असतो. वेळीच काळजी न घेतल्यास इतर आरोग्याच्या समस्या जसे मूत्रपिंड किंवा फुफ्फुसातील बिघाड किंवा यकृत खराब होण्याची शक्यता देखील उद्भवू शकते. 

आनंदी राहण्यासाठी, जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि विकृती आणि मृत्यु दर कमी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वतःची चांगली काळजी घेणे आवश्यक आहे. कोमॉर्बिड व्यक्तीमधील रोग प्रतिकारक क्षमता आधीच कमी असते. कॉमॉर्बिड रूग्णांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, मानसिक तणावापासून दूर राहणे आणि आपल्या ह्रदयाची काळजी घेणे आवश्यक आहे असे अपोलो क्लिनिक पुणे येथील जनरल फिजिशियन डॉ. मुकेश बुधवानी यांनी सांगितले. 

इतर व्याधी असलेल्या व्यक्ती डॉक्टरांनी शिफारस केलेल्या रक्त चाचण्या करुन घेण्याचा पर्याय निवडू शकतात. रक्तातील साखरेची तपासणी, वजन, यूरिक एसिडची पातळी, हिमोग्राम, मूत्रपिंड, लिव्हर फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाइल, फॅटी लिव्हरसाठी सोनोग्राफी, लठ्ठपणा बाबत तपासणी आणि आपल्या रक्तदाबाच्या पातळीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 

आहारामध्ये सर्व आवश्यक पोषक घटकांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. ताजी फळे, भाज्या, शेंगा, डाळी, संपूर्ण धान्य आणि सोयाबीनचा आहारात समावेश करा. धूम्रपान, मद्यपान, प्रक्रिया केलेले, तेलकट, मसालेदार आणि जंक फूडचे सेवन टाळा. नियमित व्यायाम करा, तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा, रात्रीची झोप टाळू नका. आपली औषधं घेणे टाळू नका, असे अपोलोच्या डॉ. प्रेरणा अग्रवाल यांनी सांगितले.