नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या चार लाखांवर पोहचली आहे. देशात गेल्या दिवसांपासून दररोज 12,500 हून अधिक कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना परिस्थिती सुधारण्याचं नाव घेत नाही. तमिळनाडूमध्येही कोरोनाचाही कहर सुरुच आहे.
महाराष्ट्रात रविवारी कोरोनाचे 3870 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात एकूण 1,32,075 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. रविवारी राज्यात कोरोनामुळे 101 जणांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या 6,170वर पोहचली आहे.
रविवारी दिवसभरात 1591 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 65,744 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या महाराष्ट्रात 60,147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राजधानी असलेल्या दिल्लीत रविवारी कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारांवर गेली आहे. गेल्या 24 तासांत 3000 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. दिल्लीत आतापर्यंत 2175 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.
गुजरातमध्ये आतापर्यंत 27,317 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1664 जण दगावले आहेत. राज्यात 19357 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये 5956 जण कोरोनाग्रस्त असून आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला आहे. त्रिपुरामध्ये 1225 जण कोरोनाग्रस्त आढळले आहेत.
केरळ 3039, कर्नाटक 8697, पंजाब 3952, मध्य प्रदेश 11724, उत्तर प्रदेश 16594, तमिळनाडू 56845, तेलंगाना 7072, पश्चिम बंगाल 13,531, उत्तराखंड 2301, राजस्थान 14536, हरियाणामध्ये 10223 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा 4,10, 461 झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 13,254 जणांचा बळी गेला आहे. सध्या 1,69,451 जणांवर उपचार सुरु आहेत.
देशात आतापर्यंत 2,27,756 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.