'तू कामावर का जातेस,' म्हणत पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्याक्षणी...

दिल्लीत एका व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. यानंतर आरोपी बाथरुममधून पत्नीचा मृतदेह ओढत बाहेर नेत असतानाच मुलाने पाहिलं.   

शिवराज यादव | Updated: Oct 19, 2023, 05:42 PM IST
'तू कामावर का जातेस,' म्हणत पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्याक्षणी...

दिल्लीत एका 52 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने कामावर जाण्याला पतीचा विरोध होता. यावरुन भांडण झालं असता पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जोडप्याच्या मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई-वडिलांमध्ये भांडण झालं होतं. वडिलांनी रात्री मला आवाज दिल्यानंतर मी पहिल्या माळ्यावरील माझ्या खोलीतून खाली आलो असता, ते बाथरुमधून आईचा मृतदेह खेचत बाहेर आणत होते. 

Add Zee News as a Preferred Source

मुलगा आकाशने विचारणा केली असता आरोपी वेद प्रकाश याने आपण दुपट्ट्याने गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपी वेद प्रकाश आपल्या मुलासह दुसऱ्या दिवशी मृतदेह घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयाने महिलेचा मृत्यू एक दिवस आधीच झाला असल्याचं म्हटलं. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवलं. महिलेचा गळा दाबलेला होता. तसंच तिच्या शरिरावर जखमांच्या खुणा होत्या अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "मुलाने आम्हाला सांगितलं की तो घराच्या पहिल्या मजल्यावर राहतो. तर त्याचे आई-वडील तळमजल्यावर राहतात. आई कामावर जात असल्याने वडिलांचा विरोध होता आणि यावरुन त्यांच्यात नेहमी भांडण होत होतं".

पोलिसांनी आकाशच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आईने वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात घऱगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. साकेत जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु होती. पण मुलाच्या लग्नावेळी दबाव असल्याने त्यांनी खटला मागे घेतला होता. 

आकाशने पोलिसांना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई रात्री कामावर गेली असल्याने वडील तिच्याशी भांडत होते. बुधवारी सकाळी 6 वाजता वडिलांनी मला फोन केला. "आकाश तळमजल्यावर गेला असता वडील आईला बाथरुममधून खेचत बाहेर आणत होते. त्यावेळी आई बेशुद्ध दिसत होती असं आकाशचं म्हणणं आहे. जेव्हा त्याने वडिलांना विचारणा केली तेव्हा त्यांनी भाडंण झालं असता मी दुपट्ट्याने गळा दाबून तिला ठार केलं आणि नंतर मृतदेह बाथरुममध्ये ठेवल्याची कबुली दिली," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

यानंतर बुधवारी सकाळी आरोपी वडील आणि मुलगा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले होते. पोलिसांना चौकशीनंतर आरोपी पतीला अटक केली असून जेलमध्ये रवानगी केली आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More