लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...

हातात नंग्या तलवारी घेऊन हल्लेखोर पोहोचले आणि महिलेला लग्नाच्या आधी घरातून फरफटत बाहेर आणलं.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2024, 01:40 PM IST
लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...  title=

मध्य प्रदेशात 22 वर्षाच्या तरुणीचं लग्नमंडपातून अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. अशोक नगरमध्ये हा प्रकार घडला आहे. कालू उर्फ सलीम खान अशी मुख्य आरोपीची ओळख पटली आहे. आरोपीने तरुणीवर बलात्कार केला होता. यानंतर व्हिडीओच्या आधारे तिची बदनामी केली होती. तरुणी दुसऱ्या तरुणाशी लग्न करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याने तिच्या कुटुंबावरही हल्ला केला. 

संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सलीम खान आपले सहकारी जोधा, समीर आणि शाहरुख यांच्यासह तरुणीच्या घरात घुसला होता. तरुणीच्या कुटुंबाने त्यांचा विरोध केला होता. यावेळी आरोपींनी तरुणीच्या वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला. तिच्या आईलाही अत्यंतत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. हल्लेखोर हातात चाकू आणि लोखंडी सळई घेऊन पोहोचले होते. त्यांनी फरफटत तरुणीला घराबाहेर ओढत आणलं. 

तरुणी आणि कुटुंबीय मदतीसाठी आरडाओरड करत असताना तिथे गर्दी जमली होती. सुरुवातीला आरोपी जमलेल्या गर्दीलाही धमकावत होते. पण नंतर जेव्हा गर्दी खूप वाढू लागली तेव्हा मात्र घाबरुन ते पळून गेले. यावेळी त्यांनी तरुणीला तिथेच सोडून पळ काढला. या सर्व गोंधळात त्यांनी तरुणीच्या तसंच तिच्या लग्न करणाऱ्या तरुणीच्या कुटुंबाला पुन्हा एकदा धमकी दिली. 

या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. पण सुरुवातीला पोलीस तक्रार दाखल करुन घेण्यात टाळाटाळ करत होते. पण स्थानिक हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तरुणी आणि तिच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.