RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे.   

शिवराज यादव | Updated: May 31, 2024, 01:06 PM IST
RBI ला मोठं यश! ब्रिटनहून परत आणलं तब्बल 6,27,90,45,00,000 किंमतीचं सोनं; महाराष्ट्रात ठेवणार हा राष्ट्रीय खजिना title=

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ब्रिटनमधून 100 टनाहून अधिक सोनं परत आणलं आहे आणि ते आपल्या राखीव निधीमध्ये हस्तांतरित केलं आहे. बिझनेस टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, आगामी महिन्यात पुन्हा एकदा इतक्याच प्रमाणातील सोनं देशात आणलं जाऊ शकतं. 1991 मध्ये गहाण ठेवण्यात आलेलं हे सोनं पहिल्यांदाच आरबीआयच्या निधीत सामील करण्यात आलं आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) अर्ध्यापेक्षा अधिक सोनं बँक ऑफ इंग्लंड (Bank of England) आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंटकडे (Bank of International Settlement) सुरक्षित ठेवलं आहे. यापैकी सुमारे एक तृतीयांश साठा देशांतर्गत ठेवण्यात आला आहे. ब्रिटनमधून सोनं भारतात आणल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला स्टोरेज कॉस्ट (RBI Gold Stock Cost) वाचविण्यात मदत होईल, जी बँक ऑफ इंडियाला दिली जाते.

1991 मध्ये गहाण ठेवण्यात आलं होतं सोनं

RBI कडून जारी करण्यात आलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, 31 मार्च 2024 पर्यंत केंद्र सरकारकडे विदेशी चलन राखीव निधीच्या रुपात 822.10 टन सोनं होतं, जे मागील वर्षी याच काळात 794.63 टनपेक्षा अधिक होतं. 1991 मध्ये, चंद्रशेखर सरकारने पेमेंट बॅलन्सच्या संकटाचा सामना करण्यासाठी सोनं गहाण ठेवलं होते. 4 ते 18 जुलै 1991 दरम्यान, RBI ने 400 मिलियन डॉलर्स उभारण्यासाठी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपान यांच्याकडे 46.91 टन सोनं गहाण ठेवलं होतं.

RBI कडून मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी

आरबीआयने जवळपास 15 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीक़डून (IMF) 200 टन सोनं खरेदी केलं होतं. 2009 मध्ये युपीए सरकारच्या कार्यकाळात जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा भारताने आपल्या मालमत्तेत विविधता आणण्यासाठी 6.7 अब्ज डॉलर्स किमतीचं 200 टन सोनं खरेदी केलं होतं. गेल्या काही वर्षांपासून आरबीआयकडून खरेदी करण्यात आलेल्या स्टॉकमध्ये वाढ झाली आहे. 

RBI कडून सोने खरेदी कऱण्याचं कारण काय?

महागाई दर आणि परकीय चलन जोखमींविरूद्ध बचाव म्हणून परकीय चलन मालमत्तेचा आधार वैविध्यपूर्ण करणं हा सोनं खरेदी करण्याचा आरबीयचा मुख्य उद्देश आहे. आरबीआयने डिसेंबर 2017 पासून बाजारातून नियमितपणे सोनं गोळा करण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यातील सोन्याचा वाटा डिसेंबर 2023 अखेर 7.75 टक्क्यांवरून एप्रिल 2024 अखेर 8.7 टक्क्यांपर्यंत वाढेल.

RBI कडून सोनं कुठे ठेवलं जातं?

आरबीआय सोनं मुंबईतील मिंट रोड स्थित आरबीआय भवन तसंच नागपूरमधील तिजोरींमध्ये ठेवतं. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या रिपोर्टनुसार, जागतिक मध्यवर्ती बँकांकडे आतापर्यंत उत्खनन केलेल्या सोन्यापैकी सुमारे 17 टक्के सोने आहे आणि 2023 च्या अखेरीस साठा 36,699 मेट्रिक टन (MT) पेक्षा जास्त होईल.