बलात्कारानंतर फेकून दिलं, मुलगी मदत मागत 8 किमी चालली, रिक्षात रक्ताचे....; उज्जैन प्रकरणी धक्कादायक खुलासे

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. तसंच तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 28, 2023, 03:46 PM IST
बलात्कारानंतर फेकून दिलं, मुलगी मदत मागत 8 किमी चालली, रिक्षात रक्ताचे....; उज्जैन प्रकरणी धक्कादायक खुलासे title=

मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये 12 वर्षाच्या मुलीवरील बलात्कार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. बलात्कारानंतर मुलगी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यांवर मदत मागत फिरत होती. मुलीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर घटना उघडकीस आली होती. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, तिघांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी परिसरातील 8 किमीपर्यंतचं सीसीटीव्ही तपासलं असता, त्यात पीडित मुलगी मदत मागत पायी चालत असल्याचं कैद झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या 38 वर्षीय रिक्षाचालकाचं नाव राकेश आहे. सीसीटीव्हीत पीडित मुलगी रस्त्यावरुन चालताना मदत मागत असल्याचं दिसत आहे. मुलगी जवळपास 8 किमी चालली आहे. 

या घटनेवर भाष्य करताना पोलिसांनी सांगितलं आहे की, सीसीटीव्हीत पीडित मुलीने जीवन खेरी येथून रिक्षा पकडल्याचं दिसत आहे. पोलिसांनी रिक्षेची तपासणी केली असता त्यात रक्ताचे डाग आढळले आहेत. या रिक्षेची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. 

पोलीस अधीक्षक सचिन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना उजेडात येण्याच्या एक दिवस आधी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलीची वेगवेगळ्या ठिकाणी पाच लोकांशी भेट झाली. या सर्वांची चौकशी केली जाणार आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये रिक्षाचालकही होता. दरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्यांची ओळख अद्याप जाहीर कऱण्यात आलेली नाही. 

नेमकी घटना काय?

उज्जैनमध्ये बुधवारी 12 वर्षीय मुलगी रस्त्यावर अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर मदत मागताना फिरत असल्याचं दिसलं होतं. एका व्यक्तीने मोबाईलमध्ये ही घटना कैद केली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती. आश्रमातील एका व्यक्तीने मुलीला कपडे दिले आणि नंतर रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात पोलिसांनी मुलीला रक्तदान केलं. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने उपचार केले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. 

महाकाल पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणावरुन मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी तपासासासाठी विशेष पथक तयार केल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे. त्याच्या रिक्षात रक्ताचे डागही आढळले आहेत. या मुलीची ओळख पटली असून ती मतीमंद आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.