नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरींची माफी मागितली आहे. त्यानंतर नितीन गडकरींनी केजरीवाल यांच्या विरोधात केलेला अब्रूनुकसानीचा दावा पतियाळा कोर्टातून मागे घेतला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी गडकरींवर आरोप करणारी काही वक्तव्यं केली होती. पण ही वक्तव्य शहानिशा न करताच केल्याचं केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांना पत्र लिहून मान्य केलं आहे.