नवीन घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, पाहा कोणत्या शहरात किती टक्क्यांनी वाढल्या किंमती

पाहा कोणत्या कोणत्या शहरात किती टक्क्यांनी घरांच्या किंमती वाढल्या आहेत. 

Updated: Jul 27, 2022, 10:40 PM IST
नवीन घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, पाहा कोणत्या शहरात किती टक्क्यांनी वाढल्या किंमती title=

New Home Rates increase : देशातील नऊ प्रमुख शहरांमधील घरांच्या सरासरी किमती या वर्षी तीन महिन्यांत (एप्रिल-जून तिमाही) 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. डेटा विश्लेषण कंपनी PropEquity च्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. अहवालानुसार, या शहरांपैकी चेन्नईमध्ये घरांच्या किमती सर्वाधिक 15 टक्क्यांनी वाढल्या आहेत. जून तिमाहीत चेन्नईमधील भारित सरासरी किंमत 15 टक्क्यांनी वाढून 6,744 रुपये प्रति चौरस फूट झाली. एका वर्षापूर्वी याच कालावधीत ती 5,855 रुपये प्रति चौरस फूट होती.

गुरुग्राम आणि हैदराबादमधील घरांच्या किमती 12 टक्क्यांनी वाढून अनुक्रमे 11,517 रुपये प्रति चौरस फूट आणि 6,472 रुपये प्रति चौरस फूट झाल्या आहे. मागील वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत ते अनुक्रमे 10,315 रुपये आणि 5,764 रुपये प्रति चौरस फूट होते.

बंगळुरूमध्ये किंमती आठ टक्क्यांनी वाढून 6,196 रुपये प्रति चौरस फूट झाल्या. गेल्या वर्षी याच कालावधीत किमती प्रति चौरस फूट 5760 रुपये होत्या. नोएडामधील सरासरी किंमत नऊ टक्क्यांनी वाढून 7,411 रुपये प्रति चौरस फूट झाली. एप्रिल-जून 2021 मध्ये ते 6,791 रुपये प्रति चौरस फूट होते. 

मुंबई, पुणे आणि ठाण्यात ही वाढ

मुंबई, ठाणे आणि पुण्यातील घरांच्या किमती तीन टक्क्यांपर्यंत वाढल्या आहेत. मुंबईतील निवासी मालमत्तांच्या किमती 18,259 रुपये प्रति चौरस फूट वरून 18,896 रुपये प्रति चौरस फूट, तर ठाण्यात त्या 6,325 रुपये प्रति चौरस फूट झाल्या, गेल्या वर्षी याच कालावधीत त्या 6,165 रुपये प्रति चौरस फूट होते. पुण्यातील घरांच्या किमती 5,189 रुपये प्रति चौरस फूट वरून 5,348 रुपये प्रति चौरस फूट वाढल्या आहेत. 

कोलकात्यात, या वर्षी एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या किमती केवळ एक टक्का वाढून प्रति चौरस फूट 5,431 रुपयावर आल्या आहेत.

एका वर्षात घराची विक्री तर वाढलीच आहे पण घराच्या किंमती ही आता वाढत आहेत. आकडेवारीनुसार, या वर्षी जून तिमाहीत घरांची विक्री वार्षिक 96 टक्क्यांनी वाढून 93,153 युनिट्सवर गेली आहे. मात्र, मागील मार्च तिमाहीच्या तुलनेत विक्रीत सात टक्क्यांनी घट झाली आहे.