मुंबई : देशात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक कमी होत असल्याने हळूहळू अनलॉक करण्यात येत आहे. मात्र, पश्चिम बंगालमधील परिस्थिती चांगली नसल्याने येथे लॉकडाऊन (Lockdown) वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) सरकारने आज सोमवारी (14 जून) राज्यातील कोविड -19 (COVID-19) परिस्थिती लक्षात घेता 1 जुलै 2021 पर्यंत निर्बंध वाढवले. मात्र, यावेळी काही सूटही देण्यात येणार आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार 25 टक्के क्षमता असणारी सर्व सरकारी कार्यालये 16 जूनपासून सुरू होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. HOD ड्यूटी रोस्टर तयार करतील, असे सांगण्यात आले आहे.
प्रवासासाठी ई-पास (E-Pass) आवश्यक असेल. सकाळी 6:00 ते 9:00 पर्यंत मॉर्निंग वॉकसाठी उद्याने खुली राहतील. मात्र, यासाठी नियम असणार आहे. ज्यांचे कोविड लसीकरण झाले असेल त्यांनाचा पार्कमध्ये प्रवेश मिळेल अर्थाच त्यांना उद्यानांमध्ये परवानगी दिली जाईल. सर्व बाजारपेठा सकाळी 7:00 ते 11:00 दरम्यान खुल्या असतील. इतर किरकोळ दुकाने 11 ते संध्याकाळी 6 वाजेदरम्यान सुरू राहतील.
दरम्यान, देशातील कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेचा परिणाम काही प्रमाणात कमी होऊ लागला आहे. तथापि, संकट अद्याप पूर्णपणे संपलेले नाही. देशातली गेल्या 24 तासातली कोरोना रुग्ण संख्या जाहीर करण्यात आलीय. देशात गेल्या 24 तासात 70 हजार 421 जणांना कोरोनाची लागण झालीय. रुग्ण संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरीही अद्याप मृत्यू संख्येचं प्रमाण देशात अधिक आहे. गेल्या 24 तासांत 3 हजार 921 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.