देशात 24 तासांत कोरोनाचे 114 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा 700पार

आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

Updated: Mar 28, 2020, 08:26 AM IST
देशात 24 तासांत कोरोनाचे 114 नवे रुग्ण; कोरोनाबाधितांचा आकडा 700पार

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा कहर झेलणाऱ्या सर्वच देशांसमोर दररोज नवीन आव्हानंसमोर येत आहेत. अमेरिका, इटलीमध्ये परिस्थिती गंभीर आहे. भारतातही गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाची नवीन 114 प्रकरणं समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 748 कोरोनाग्रस्त आढळून आले असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 67 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

लॉकडाऊनंतर शहरांतून मोठ्या संख्येने मजूर स्थलांतरित होत आहेत. राज्यांतील गृहमंत्रालयाने लोकांना बाहेर न जाण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात आले आहेत. 

देशात 24 तासांत कोरोनाचे नवे 114 रुग्ण 

मुंबईत कोरोनाग्रस्त 85 वर्षीय महिलेचा मृत्यू. 

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या -

पिंपरी-चिंचवड 13 
पुणे 18
मुंबई 51, 4 मृत्यू
सांगली 24
नवी मुंबई, कल्याण-डोबिंवली प्रत्येकी 6, 1 मृत्यू
नागपूर 9 
ठाणे 5
यवतमाळ 4
अहमदनगर 3
सातारा, पनवेल प्रत्येकी 2
उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, वसई-विरार, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया, गुजरात - प्रत्येकी 1. महाराष्ट्रात अशी 153 कोरोनाग्रस्तांसह 5 मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 

राजस्थानात कोरोनाचे 50 पॉझिटिव्ह रुग्ण

दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 40वर, एकाचा मृत्यू तर 5 जणांना डिस्चार्ज

उत्तरप्रदेशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 50 पार
 
अमेरिकेत आतापर्यंत 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असून शुक्रवारी 345 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत 24 तासांत 18000 नवे कोरोना रुग्ण.

इटलीमध्ये 24 तासांत जवळपास 1000 लोकांचा मृत्यू झालाय.

पाकिस्तानात 1300 कोरोनाग्रस्त, त्यापैकी 441 सिंध, 427 पंजाब, 131 बलुचिस्तान. 9 जणांचा मृत्यू तर 23 जण कोरोनातून बरे झाल्याची माहिती आहे.