अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात आली आणि डॉक्टरच्या प्रेमात पडली

एका नजरेत सुरू डॉक्टरांसोबत प्रेम कहाणी, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर...   

Updated: May 5, 2022, 03:47 PM IST
अजब प्रेमाची गजब कहाणी! प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात आली आणि डॉक्टरच्या प्रेमात पडली title=

बिहार : डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप... व्यक्तीची प्रकृती बिघडली तर आपण पहिली हाक मारतो ती म्हणजे डॉक्टरांना... पण याठिकाणी तर एका डॉक्टरने एका मुलीला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन दिलं. एक मुलगी तिच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करते. रुग्णालयात असलेल्या डॉक्टरांचं रुग्णाच्या मुलीवर जीव जडतो आणि क्षणाचाही विलंब न करता दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात. सध्या डॉक्टर आणि रुग्णाच्या मुलीची प्रेम कहाणी सर्वत्र व्हायरल होत आहे. 

बिहारमधील हाजीपूरमधील स्पेशल लव्ह स्टोरी
बिहारमधील हाजीपूर येथील सदर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरने रुग्णाच्या मुलीसोबत लग्न केलं आहे. डॉक्टरचं नाव डॉ. मनिंदर कुमार सिंह असून रुग्णाच्या मुलीचं नाव प्रिती सिंह असं आहे. 

प्रिती आईसोबत रुग्णालयात आली. आता प्रितीच्या आईची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयात प्रितीला पाहिल्यानंतर डॉ. मनिंदर कुमार सिंह पहिल्याचं नजरेत तिच्या प्रेमात पडले. त्यानंतर अवघ्या सात दिवसांत दोघांनी लग्न केलं.  

डॉ. मनिंदर कुमार सिंह यांनी प्रितीच्या आईकडे लग्नाची मागणी घातली. प्रितीच्या आईने दोघांच्या लग्नाला मान्यता देखील दिली. एवढंच नाही, तर डॉक्टरांच्या कुटुंबाने देखील लग्नास विरोध केला नाही.  आता प्रिती सिंह आणि डॉ. मनिंदर कुमार सिंह  आनंदी आयुष्य जगत आहेत.