मुंबई : सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी आणि कशी व्हायरल होईल, याबद्दल कोणालाही सांगता येणार नाही. सोशल मीडियावरील एखादा कटेन्ट ह्युमन इंट्रेस्ट वाला असला तर तो जोरदार ट्रेंड होऊ लागतं. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो एका लग्नातील व्हिडीओ असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये नवरदेव हुंड्याची मागणी करताना दिसत आहे. तो पैसे, सोन्याची चैन आणि अंगठीची मागणी करत आहे. तसेच जर मला पैसे मिळाले नाही तर मी वरात घेऊन नववधुला परत न घेताच घरी जाईन अशी धमकी देताना पाहायला मिळत आहे. एवढंच काय तर हा नवरदेव असं देखील म्हणत आहे की, 'तुमच्याकडे पैसे नव्हते, तर तुम्ही तुमच्या ऐपतीप्रमाणे का लग्न केलं नाही आपल्या मुलीचं. सरकारी नोकरीवाला नवरा हवा असेल, तर तुम्हाला हुंडा द्यावाच लागेल आणि मला तो हवाय.'
त्याचं हे बोलणं ऐकून तुम्हाला त्याचा राग येईल आणि संताप देखील. यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे. परंतु या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ मागचं सत्य उघड झालं आहे. वास्तविक, हा व्हिडिओ एक नाटक आहे, ज्यामध्ये वधू-वर अभिनय करत आहेत.
दहेज
इस कालू के कान के नीचे 10 तमाचा मारो pic.twitter.com/DPF2fm02Xl— हम लोग We The People (@humlogindia) March 6, 2022
'Alt News'नुसार, हा व्हिडीओ 'दिव्या विक्रम' नावाच्या फेसबुक पेजवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ 25 फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ एखाद्या नाटकाचा भाग असल्याचे सांगितले जात आहे, ज्या फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे, त्यावरून असे अनेक व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. हा पेज कंटेन्ट क्रिएटर पेज असल्याचे म्हटले जात आहे.
या पेजवर असे अनेक व्हिडीओ पाहण्यात आले होते, जे लग्नाशी संबंधीत आहेत. हे पेज विक्रम मिश्रा नावाच्या व्यक्ती चालवतो. Alt News शी बोलताना त्यांनी सांगितले की, तो आणि त्यांची टीम 'जय मिथिला' नावाचे यूट्यूब चॅनल चालवते. ज्यामध्ये असे व्हिडीओ तयार करून पोस्ट केले जातात. विक्रम मिश्रा यांनी सांगितले की, व्हिडिओमध्ये दिसणारे वधू आणि वर दोघेही कलाकार आहेत.