मध्य प्रदेशात पुरामुळे नऊ जिल्हयात मोठे नुकसान, नऊ हजार नागरिकांचं स्थलांतर

मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नऊ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झालंले आहे. नऊ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी १७० निवासी शिबिरे तयार करण्यात आलीत.

Updated: Sep 1, 2020, 10:09 AM IST
मध्य प्रदेशात पुरामुळे नऊ जिल्हयात मोठे नुकसान, नऊ हजार नागरिकांचं स्थलांतर   title=

भोपाळ : मध्य प्रदेशात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे नऊ जिल्ह्यांचे मोठे नुकसान झालंले आहे. नऊ हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर करुन त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी १७० निवासी शिबिरे तयार करण्यात आलीत.

दरम्यान, मध्य प्रदेशातील रायसेन भागात पुरात अडकलेल्या नागरिकांची स्थानिक प्रशासनानं सैन्याच्या मदतीनं सुटका केली. यात एका गरोदर महिलेला वाचवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ही महिला आणि तिला झालेलं बाळ दोन्ही सुखरुप आहेत.

मध्यप्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झालीय. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. तसंच पूरग्रस्तांशी संवाद साधला. बोटीतून त्यांनी सर्व परिसराची पाहणी केली. जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे नर्मदा नदी धोक्याच्या पातळीवरून वाहतेय. त्यामुळे गंभीर परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात सैन्यही तैनात करण्यात आले आहे.

राजस्थानातही मुसळधार पाऊस सुरु आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे जैसलमेर मध्ये पूरस्थिती निर्माण झालीये. येथील चुंधी गणेश मंदिरात पाणी शिरल आहे. मंदिराचा जवळपास अर्धा भाग पाण्याखाली गेला आहे.