मैत्री, प्रेम, अश्लील व्हिडीओ आणि 'लव्ह जिहाद'च्या चक्रव्यूहातून अशी झाली तरुणीची सुटका

मध्य प्रदेशातील गुनामध्ये लव्ह जिहादशी संबंधित एक प्रकरण समोर आलंय. एका तरुणाने नाव बदलून एका तरुणीशी मैत्री केली, त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर बलात्कार आणि मारहाण केल्याची घटना समोर आलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 24, 2024, 02:05 PM IST
मैत्री, प्रेम, अश्लील व्हिडीओ आणि 'लव्ह जिहाद'च्या चक्रव्यूहातून अशी झाली तरुणीची सुटका title=
friendship love videos Guna Girl Got Trapped Love Jihad Crime News

Guna Girl Got Trapped Love Jihad : मध्य प्रदेशातील गुनामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लव्ह जिहादशी संबंधित या प्रकरणामुळे एकच खळबळ माजलीय. मैत्री, प्रेम, अश्लिल व्हिडीओ आणि लव्ह जिहादच्या चक्रव्यूहातून तरुणीचा छळ झाल्याच समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाने आधी नाव बदलून सोशल मीडियावर तरुणीशी मैत्री केली. त्यानंतर तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. यानंतर तरुण दीड वर्ष तरुणीवर त्या तरुणाने बलात्कार केला. यादरम्यान तरुणाने तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप तरुणीने केलाय. तरुणीने सांगितले की, तरुणाने तिचे अश्लील व्हिडिओही बनवले आणि तो तिला नेहमी ब्लॅकमेल करत होता. (friendship love videos Guna Girl Got Trapped Love Jihad Crime News)

भय्यू नावाच्या आयडीवरून मेसेज केला अन् मग...

हे प्रकरण गुना जिल्ह्यातील सिटी कोतवालीमधील आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पीडित तरुणीने सांगितले की, आरोपी तरुणाने पहिल्यांदा तिला भय्यू नावाच्या आयडीवरून इन्स्टाग्रामवर मेसेज करायला सुरुवात केली. त्यावर तरुणीने त्याला विचारलं तू कोण आहेस आणि तो मला कसा ओळखतो? असे प्रश्न विचारलेत. पण त्या तरुणाने गोलमोल उत्तर ते तिच्याशी मेसेजवर बोलण्यास सुरुवात केली. दरम्यान, एकदा तरुणी रुग्णालयात गेली होती, तिथेही तो तरुण पोहोचला. इथे त्या तरुणाने तरुणीसोबत सेल्फी काढण्याचा आग्रह धरला.  त्यानंतर आरोपी तरुण तरुणीचे घर शोधून तिच्या घरी पोहोचला. 

दीड वर्षात 3 वेळा घरं बदलली...

दोघांमधील मैत्रीचे रूपांतर आता प्रेमात झाल होत. यादरम्यान तरुणाने तरुणीचे अनेक अश्लील व्हिडीओ काढायला सुरुवात केली होती. काही दिवसांनी आरोपी तरुण तरुणीला मारहाण करायला लागला. पीडित तरुणीने सांगितले की, हा तरुण गेल्या दीड वर्षांपासून तिच्यावर बलात्कार आणि मारहाण करत होता. आरोपीच्या अत्याचारामुळे ती इतकी अस्वस्थ झाली होती की, दीड वर्षात तीन घरं बदलली होती. तिने असेही सांगितले की, केवळ 3 महिन्यांपूर्वीच तिला आरोपीचं खरं नाव कळलं. त्या आरोपीच नाव अर्शद खान होतं. सत्य समोर आल्यानंतर आरोपीने तिच्यावर धर्म परिवर्तन करण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. आरोपीच्या वाढत्या अत्याचाराला कंटाळून मुलीने शनिवारी रात्री हिंदू जागरण मंचच्या कार्यकर्त्यासोबत जाऊन आरोपीविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर ही संपूर्ण घटना समोर आली.