'भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू', सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार

Gorakhpur Crime: तरुणी ज्या ऑटोमध्ये जात होती ती बेळघाट येथील विवेक यादव चालवत होता. अपहरणाच्या घटनेनंतर पोलिसांना न सांगता तो राहत असलेल्या खजनीच्या छप्या येथे गेला होता. गँगरेपच्या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते राजघाट पुलापर्यंत लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा फुटेजची माहिती गोळा केली.

Pravin Dabholkar | Updated: Aug 4, 2023, 03:23 PM IST
'भेटायला आली नाहीस तर गोळ्या घालू', सोशल मीडिया स्टार तरुणीवर गुंडांचा बेशुद्ध होईपर्यंत अत्याचार  title=

Gorakhpur Crime: सोशल मीडियात प्रसिद्ध असणे एका तरुणीला वैयक्तिक आयुष्यात धोक्याचे ठरले आहे. एका इन्फ्ल्यूएन्सर तरुणीवर गुंडांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे ती तरुणी बेशुद्ध होईपर्यंत आरोपी अत्याचार करतच राहिले. सलग 20 मिनिटे त्यांचा अत्याचार सुरु होता. गोरखपूर रेल्वे स्थानक परिसरात ही घटना घडली. सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर तरुणी गोरखपूर रेल्वे स्थानकावरून रिक्षातून घरी चालली होती. यावेळी पाच दुचाकी आणि स्कूटीवर स्वार असलेल्या तरुणांनी तिचा पाठलाग करुन आपल्या वासनेचे शिकार बनवले. यामुळे परिसरात चिंतेचे वातावरण आहे. 

गँगस्टर प्रद्युम्नन असे यातील आरोपीचे नाव असून त्याने पीडित तरुणीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यात स्वत:चा नंबर सेव्ह केला. त्यानंतर तिच्या डोक्यावर बंदूक ठेवून मी जेव्हाही फोन करेन तेव्हा मला भेटायला ये, नाहीतर रूमवर येऊन गोळी झाडेन, असे सांगितले. त्यानंतर गुंडांची टोळी तिचे घर पाहण्यासाठी तिला घरी सोडायला गेली. 

रात्री उशिरा पोलिसांनी बेळघाट येथील रहिवासी असलेल्या ऑटोचालकालाही ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. याशिवाय पुलाजवळ अपहरण करणाऱ्या तरुणांचा शोध सुरू आहे.

तरुणी ज्या ऑटोमध्ये जात होती ती बेळघाट येथील विवेक यादव चालवत होता. अपहरणाच्या घटनेनंतर पोलिसांना न सांगता तो राहत असलेल्या खजनीच्या छप्या येथे गेला होता. गँगरेपच्या घटनेनंतर पोलिसांनी रेल्वे स्थानक ते राजघाट पुलापर्यंत लावण्यात आलेल्या सीसी कॅमेरा फुटेजची माहिती गोळा केली. रात्री उशिरा विवेकला गिडा पोलिस ठाण्यात बोलावून अधिकाऱ्यांनी घटनेबाबत चौकशी केली. 

रिक्षाचालक विवेकने दिलेली माहिती धक्कादायक होती. राजघाट पुलाआधीही आरोपी ऑटोमधून मागे-पुढे करत होते. ते लोक स्टंट करतायत असे त्याला सुरुवातीला वाटले, पण तो पूल ओलांडताच ओव्हरटेक करून त्याला थांबवण्यात आले. गुंड मुलीला सोबत घेऊन गेले. त्याने विरोध केल्यावर त्यांनी त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवली. आपण कोणत्या संकटात अडकू नये म्हणून रिक्षाचालक कोणालाही न सांगता निघून गेला. घटनेची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी रात्रीच पुलाजवळ वाळू काढणाऱ्या लोकांना विचारले, तेव्हा त्यांनी आरडाओरडा ऐकल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. 

पोलिसांनी मुख्य आरोपी प्रद्युम्नची बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये चौकशी केली असता त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी तो एका बिर्याणीच्या दुकानात मुलीला भेटला होता. माझ्याकडे काम कर, मी दरमहा एक लाख रुपये देईन, असे त्याने तिला सांगितले होते. पोलिसांनी पीडितेला विचारणा केली असता तिने असे काही घडले नसल्याचे सांगितले. रात्री प्रद्युम्नचे कोणाशी बोलणे झाले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आहे.

गुंडाने यापूर्वीही स्थानिक मुलींसोबत असे प्रकार केले आहेत. प्रद्युम्न हा त्याच्या साथीदारांसह रात्री अशा घटना करत असे. पण ते साथीदार अजून पकडले गेलेले नाहीत, अशी माहिती देण्यात आली.

मुख्य आरोपी आणि त्याच्या चार साथीदारांना अटक करून तुरुंगात पाठवले आहे, एकाचा शोध सुरू आहे. ऑटोचालकाची चौकशी सुरू आहे. दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती एसएसपी डॉ. गौरव ग्रोवर यांनी दिली.