Corona Zero Death : कोरोनामुळे (Corona Virus) देशासह जगात मोठा हाहाकार माजला होता. या जीवघेण्या व्हायरसमुळे अनेकांचा मृत्यू झाला. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले. काहींचा रोजगार गेला. अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली. एकूणच कोरोनात सर्वांचेच हाल झाले. दररोज येणाऱ्या कोरोनाच्या आकड्याने अनेक जण धास्तावले होते. मृतांचा आकडा आणि पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ऐकून भीती वाढत होती. पॉझिटिव्ह शब्दही नेगिटिव्ह झाला होता. मात्र आरोग्य व्यवस्थेच्या जिगरबाज कामगिरीमुळे कोरोनावर नियंत्रण मिळवलं. (india corona update biggest win on covid after 32 months zero death register in country)
यानंतर आता कोरोना सुरु झाल्यापासून ते आतापर्यंतची सर्वात मोठी आणि पॉझिटिव्ह (Positive News) बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे आज 8 नोव्हेंबर मंगळवारी देशात कोरोनामुळे एकाचाही (Today Corona Zero Death मृत्यू झालेला नाही. विशेष बाब म्हणजे कोरोनाच्या शिरकावानंतर ते आतापर्यंत आजच पहिल्यांदाच एकाचाही मृत्यू झालेला नाही.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry Of Health) दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी गेल्या 24 तासात देशात 625 जणांना कोरोना झालाय. विशेष म्हणजे 9 एप्रिल 2020 नंतर पहिल्यांदाच इतक्या कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 2020 नंतर पहिल्यांदाच 24 तासांमध्ये एकाही मृताची नोंद झाली नाही.