देशात मोठ्या प्रमाणा बाधितांच्या आकड्यात वाढ, चीनला टाकले मागे

गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.  

Updated: May 16, 2020, 11:10 AM IST
देशात मोठ्या प्रमाणा बाधितांच्या आकड्यात वाढ, चीनला टाकले मागे title=

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत देशात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात तब्बल ३९७० रुग्ण झाले आहेत. देशात आता एकूण कोरोना रुग्ण ८५,९४० झालीय. यामुळे भारताने रूग्णसंख्येत चीनलाही ओव्हरटेक केले आहे. देशात २७५२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.  

India surpasses China as coronavirus COVID-19 count reaches 85,940, death toll at 2,752

देशात सर्वाधिक कोरोना बाधितांचा आकडा हा महाराष्ट्र राज्यात आहे. महाराष्ट्रात २९१०० आहेत. तर ६५६४ रुग्ण बरे झाले असून १०६८ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरात राज्य दोन क्रमांकावर होते. आता तामिळनाडू हे दोन क्रमांकावर पोहोचले आहे. तामिळनाडूत १०१०८ रुग्ण असून आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५९९ रुग्ण ठणठणीत झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात राज्य आहे. गुजरात राज्यात ९९३१ रुग्ण असून ६०६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४०३५ रुग्ण बरे झाले आहेत. त्यानंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. दिल्लीत कोरोना बाधितांचा आकडा ८८९५ इतका आहे. ३५१८ रुग्ण बरे झाले असून १२३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर राज्यस्थानचा नंबर लागतो. ४७२७ रुग्ण बाधित असून २६७७ रुग्ण बरे झाले आहेत. तर १२५ जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने अधिक माहिती देताना म्हटले आहे की, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ३५.०८. आहे. आतापर्यंत ३०१५२ लोक बरे झाले आहेत. तर ५३०३५ रुग्ण संक्रमित झालेले आहेत. शुक्रवारी सकाळपासून झालेल्या १०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ४९  गुजरातमधील २०, पश्चिम बंगालमधील १०, दिल्लीत आठ, उत्तर प्रदेशात सात, तामिळनाडूमधील पाच, मध्य प्रदेशात दोन, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशातील प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.