नवी दिल्ली : आजपासून इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू भारत दौर्यावर आले आहेत.
बेंजामिन मोदींसाठी खास गिफ्ट आणणार आहेत. गेल्यावर्षी मोदी इस्त्राईल दौर्यावर असताना त्यांना मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप आवडली होती. इस्त्राईलमध्ये ओल्गा बीचवर नेतन्याहू ड्राईव्हही केली होती. आता हीच मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीप मोदींना भेट म्हणून मिळणार आहे.
मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीपच्या मदतीने समुद्रातील खारे पाणी गोड केले जाऊ शकते.
जीपचे वजन 1540 किलो आहे. तर बोटीचा स्पीड 90 किलोमीटर प्रतितास आहे.
जीप कोणत्याही मौसमात चालू शकते. तसेच नदी, तलाव, समुद्र, विहीर अशा कोणत्याही ठिकाणी ही जीप सहज कनेक्ट होते.
मोबाईल वॉटर प्युरिफिकेशन जीपची किंमत 3.90 लाख शेकेल्स म्हणजेच 72 लाख रूपये आहे.
भूकंप, महापूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान ही जीप फार महत्त्वाची मदत करणार आहे. ही जीप एका दिवसात 20 हजार लीटर समुद्री पाण्यात आणि 80 लीटर दूषित पाण्यात काम करू शकते. भारतात पंजाबमध्ये अनेक दुर्गम भागात पाणी वेळीच पोहचवण्यासाठी या जीपचा फायदा होणार आहे.