close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Election results 2019 : मतमोजणी सुरू | भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे आजच्या लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालानंतर स्पष्ट होईल

Election results 2019 : मतमोजणी सुरू | भाजपनं पार केला बहुमताचा आकडा

दुपारी १.०० वाजेपर्यंत

* ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीही सोशल मीडियावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए आणि भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

* मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना फोनवरून दिल्या विजयाच्या शुभेच्छा

* श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिल्या नरेंद्र मोदींना विजयाच्या शुभेच्छा 

 

* देशभरातील कल जवळ-जवळ आता स्पष्ट झालेत. दुपारी १ वाजेपर्यंत ५४२ जागांपैंकी भाजप+ ३४८ जागांवर तर काँग्रेस+ ८९ जागांवर आघाडीवर आहे. तर इतर १०५ जागांवर आघाडीवर आहेत. वाराणसी मतदार संघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर आहेत. तर दुसरीकडे अमेठी मतदार संघातून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र मागे पडलेत. वायनाड मतदारसंघात मात्र राहुल गांधी आघाडीवर आहेत. काही महत्त्वाच्या राज्यांतील निकालाच्या आकड्यांवर एक नजर टाकुयात... 

महाराष्ट्र

भाजपा+  43

काँग्रेस+   04

इतर      01

बिहार

भाजपा+  39

काँग्रेस+  02

इतर     0

पश्चिम पंगाल

टीएमसी+  24

भाजपा+   17

काँग्रेस+    01

तामिळनाडू 

भाजपा+  01

काँग्रेस+  33 

इतर     04

मध्यप्रदेश

भाजपा+  28

काँग्रेस+  01

इतर     0

कर्नाटक

भाजपा+  22

काँग्रेस+  05

इतर     01

गुजरात

भाजपा+  26

काँग्रेस+  00

इतर     00

आंध्रप्रदेश

वायएसआर  24

टीडीपी      01

इतर        01

उत्तरप्रदेश

भाजपा+  54

काँग्रेस+  01

एमजीबी  25

इतर     00

सकाळी ११.०० वाजता

* बारामतीत १२ व्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांनी मिळवलं ७० हजारांच्या वर मताधिक्य

* अमेठीत भाजपाच्या स्मृती इराणींनी पुन्हा राहुल गांधी यांना टाकलं मागे | स्मृती इराणींची ७६०० मतांनी आघाडी

* गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी आपल्या गांधीनगरस्थित घराबाहेर येऊन मानले जनतेचे आभार 

* साताऱ्यात राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले १५७१९ मतांनी आघाडीवर

* रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत ३८०३३ मतांनी आघाडीवर

* भाजपनं पार केला बहुमताचा आकडा | ११.०० वाजेपर्यंत भाजप+ ३३७, काँग्रेस+८३ तर इतर १२२ जागांवर आघाडीवर 

* मावळमधून पार्थ पवार ८०३८९ मतांनी पिछाडीवर | पवार कुटुंबियांना धक्का | अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार पराभवाच्या छायेत

* बारामतीमधून नवव्या फेरीअखेर सुप्रिया सुळे यांना ९२७३ मतांची आघाडी 

सकाळी १०.०० वाजता

* सोलापूरमधून काँग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे आघाडीवर

* सांगलीमधून भाजपाचे संजय काका पाटील १५७३६ मतांनी आघाडीवर

* नांदेडमधून भाजपाचे सुधाकर श्रृंगारे ११६३८ मतांनी आघाडीवर 

* भंडारा - गोंदियामधून भाजपचे सुनील मेंढे १७०९४ मतांनी आघाडीवर 

* औरंगाबाद : हर्षवर्धन जाधव यांची ७०० मतांनी आघाडी | इम्तियाज जलील दुसऱ्या क्रमांकावर | चंद्रकांत खैरे तिसऱ्या क्रमांकावर

* ठाणे लोकसभा मतदारसंघात सेनेच्या राजन विचारे यांना ५० हजार मतांची आघाडी

* मुंबई : निकालाचे कल पाहता सकाळपासून मुंबईतील काँग्रेस कार्यालयामध्ये शांतता 

* दिल्ली : भाजपा मुख्यालयात सुरुवातीचे कल पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष | फटाके फोडले, ढोलाच्या तालावर धरला ताल

* अहमदनगर भाजपा उमेदवार सुजय विखे पाटील ३७११० मतांनी आघाडीवर | संग्राम जगताप दुसऱ्या क्रमांकावर 

* औरंगाबादमधून एमआयएम उमेदवारी इम्तियाज जलील १५,७५८ मतांनी आघाडीवर

* निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, भाजपा २७९ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस ५१ जागांवर आघाडीवर

* कर्नाटकमधील २८ लोकसभा मतदारसंघापैंकी तब्बल २४ लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार आघाडीवर | काँग्रेसला केवळ दोन जागांवर आघाडी 

* मैनपुरीमधून मुलायम सिंह आघाडीवर

* रामपूरमधून जया प्रदा आघाडीवर | आझम खान पिछाडीवर 

* लखनऊमधून भाजप उमेदवार राजनाथ सिंह आघाडीवर

* उत्तर प्रदेशातील भाजपच्या उमेदवार मनेका गांधी पिछाडीवर 

* वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी २० हजार मतांनी आघाडीवर तर भाजप अध्यक्ष गांधीनगरमधून अमित शाह ५० हजार मतांनी आघाडीवर

सकाळी ९.०० वाजता

* सांगली : भाजपाचे संजय काका पाटील १२०० मतांनी आघाडीवर | वंचीत बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर दुसऱ्या स्थानावर

* चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर यांना १०६७९ मतं तर बाळू धानोरकर यांना ८७३४ मतं | भाजप १०४५ मतांनी पुढे

* शिरूर : अमोल कोल्हेंना ५६४३८ मतं तर शिवाजी आढळराव पाटील यांना ३९९८८ मतं | अमोल कोल्हे १६४५० मतांनी आघाडीवर 

* अकोला : दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू | भाजपचे संजय धोत्रे १८२२३ मतांनी पुढे | दुसऱ्या क्रमांकावर प्रकाश आंबेडकर 

* नागपूर : पहिल्या फेरीअखेर भाजपाचे नितीन गडकरींना ४०,८५१ मतं तर पटोलेंना २५२२९ मतं | भाजपला १५६२२ मतांची आघाडी

* गुनामधून ज्योतिरादित्य शिंदे पिछाडीवर

* वाराणसीमधून नरेंद्र मोदी तर रायबरेलीमधून सोनिया गांधींनी पुन्हा एकदा घेतली आघाडी

* अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार तब्बल ३१ हजार मतांनी पिछाडीवर

* रायबरेलीमधून काँग्रेस उमेदवार सोनिया गांधी पिछाडीवर

* राज्यातील दिग्गज पिछाडीवर | सुप्रिया सुळे, पार्थ पवार, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण पिछाडीवर

* मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर तासाभरात भाजपानं गाठला बहुमताचा आकडा | भाजपा+ २७२ जागांवर आघाडीवर तर काँग्रेस+ १०२ जागांवर आघाडीवर तर इतर पक्षांना ६३ जागांवर आघाडी

* वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी तब्बल १७,००० मतांनी आघाडीवर

* अमेठी मतदारसंघातून स्मृती इराणी आघाडीवर | राहुल गांधी तब्बल ५७०० मतांनी पिछाडीवर

* जळगाव : भाजपाचे उन्मेष पाटील आघाडीवर | राष्ट्रवादीचे माजी मंत्री देवकर पिछाडीवर 

* बारामती : सुप्रीया सुळे यांची आघाडी घटली | विरोधी उमेदवार कांचन कुल यांच्यापेक्षा केवळ ४०० मतांनी सुप्रिया सुळे आघाडीवर

* महाराष्ट्रातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघांतील कल हाती : भाजप - १७ | शिवसेना - १३ | काँग्रेस - ८  राष्ट्रवादी - ८ | इतर - २ जागांवर आघाडी

सकाळी ८.०० वाजता

* हैदराबाद मतदार संघातून AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आघाडीवर

* बेगुसराय मतदार संघातून कन्हैया कुमार पिछाडीवर 

* वाराणसीमधून पंतप्रधान आणि भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी पिछाडीवर

* बीडमधून भाजप उमेदवार प्रितम मुंडे आघाडीवर

* फतेहपूरसिक्री मतदारसंघातून राज बब्बर पिछाडीवर 

* काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी वायनाडमधून आघाडीवर तर अमेठीतून पिछाडीवर | अमेठीतून भाजप उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर

* मावळ मतदार संघातून पार्थ पवार पिछाडीवर

* उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर पिछाडीवर | भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी घेतली आघाडी

* रायबरेलीमधून सोनिया गांधी आघाडीवर 

* शसासाराममधून काँग्रेस उमेदवार मीरा कुमार आघाडीवर 

* गुजरातच्या गांधीनगरमधून भाजप उमेदवार अमित शाह आघाडीवर

* भाजप १३० जागांवर आघाडी | तर काँग्रेस ५७ जागांवर आघाडीवर | इतरांना २७ जागांवर आघाडी

* बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुप्रीया सुळे आघाडीवर

* भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ३००० मतांनी आघाडीवर 

* अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष आणि उमेदवार राहुल गांधी आघाडीवर

* नंदुरबारमध्ये हिना गावित आघाडीवर 

* हातकणंगलेमधून राजू शेट्टी आघाडीवर

* कोल्हापुरात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक आघाडीवर

* वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

* सुरुवातीला काही वेळातच भाजपनं घेतील ४८ जागांवर आघाडी | तर यूपीए २० जागांवर आघाडीवर 

* नांदेड, महाराष्ट्र : नांदेडमधून काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण आघाडीवर

* पहिला कल एनडीएच्या बाजुनं 

* देशभरात मतमोजणीला सुरुवात | थोड्याच वेळात कल येणार हाती 

सकाळी ७.०० वाजता 

* नवी दिल्ली : दिल्लीतील भाजप मुख्यालयाबाहेर मृत्युंजय मंत्राचा जाप सुरू | विद्यार्थ्यांचा मोदींच्या समर्थनार्थ चौकीदाराचे टी-शर्ट घालून भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष  

* नागपूर : नितीन गडकरी यांच्या घरासमोर विजयाची जय्यत तयारी | खास मंडप उभारला 


गडकरींच्या घरी जय्यत तयारी, नागपूर

* नवी दिल्ली : काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं होम-हवन, काँग्रेस नेते जगदीश शर्मा यांनी राहुल गांधी पंतप्रधानपदी विराजमान व्हावेत, अशी केली प्रार्थना | काँग्रेस पक्ष सत्तेत आला तर राम मंदिर बनवलं जाईल, शर्मांचा दावा | 'राहुल - प्रियांका सेना जिंदाबाद' पोस्टर फडकावले

* मुंबई : काँग्रेस नेते आणि उत्तर-पश्चिम मतदार संघातील उमेदवार संजय निरुपम सकाळीच सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी दाखल 

* भाजपचे गोरखपूर लोकसभा मतदार संघाचे उमेदवारी आणि अभिनेता रवि किशन यांनी निकालाआधी देवाकडे केली प्रार्थना 

 

Lok sabha Election results 2019 : कलाविश्वातील 'या' चेहऱ्यांमुळे यंदाची लोकसभा निवडणूक ठरली आणखी रंगतदार

मुंबई : अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या भारतातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आज सर्वोच्च शिखर गाठणार आहे. सतराव्या लोकसभेच्या ५४३ पैकी ५४२ जागांचे निकाल अवघ्या काही वेळात जाहीर होणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि  काँग्रेसमध्ये प्रमुख लढत असणार आहे. देशभरात तब्बल सात टप्प्यांमध्ये  मतदान घेण्यात आलं.. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. अर्ध्या तासानंतर कल हाती येण्यास सुरुवात होईल. त्यानंतर कोण जिंकणार? कोणता पक्ष सरकार स्थापन करणार? हे स्पष्ट होईल. यंदा ईव्हीएम मशीनसह व्हीव्हीपॅट मशीनमधील चिठ्ठ्यांचीही मोजणी होणार आहे. त्यामुळे निकाल येण्यास उशीर होण्याची शक्याता आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगानं ईव्हीएम मशीनसह छेडछाड झाल्याचे सर्व आरोप फेटाळलेत. देशातील सर्व ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिलीय. उत्तर प्रदेशात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरुन निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम मशीन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असल्याचे व्हिडीओ ट्विटरवर व्हायरल झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण आलं आहे. 

मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स उमेदवारांसमोर योग्य पद्धतीने सील करण्यात आल्या होत्या. त्यावेळी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलं होतं. तसंच सीसीटीव्ही कॅमेरेही होते आणि सुरक्षा जवानही उपस्थित होते. त्यामुळे ईव्हीएम छेडछाडीचे सर्व आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे.