मुंबई : लग्न असो किंवा कोणताही कार्यक्रम नाच गाण्याशिवाय तो अपूर्णच आहे. ज्यामुळे बहुतांश कार्यक्रमात डीजे किंवा गाण्याची सोय केली जाते. ज्यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच लोक आनंद घेतात. सध्या असाच एका कार्यक्रमातील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो लोकांना पोट धरुन हसायला लावत आहे.
खरंतर या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोणतातरी कार्यक्रम सुरु आहे. ज्यामध्ये अनेक लोक डान्स करत आहेत. तसेच येथे लाईटिंग देखील लावली गेली आहे. सुरुवातीला सर्वकाही चांगलं सुरु होतं, परंतु जेव्हा एक व्यक्ती महिलेला नाचायला घेऊन आला तेव्हा मात्र सर्वच प्रकरण बिघडलं.
सगळे पुरुष आपल्या मस्तीत नाचत असताना, एक व्यक्ती महिलेला नाचायला घेऊन आला त्यानंतर ही गंमत सुरु झाली. या महिलेसोबत नाचण्यासाठी अनेक पुरुष मंडळी भांडणं करु लागले.
नुसतं भांडणंच नाही तर हे प्रकरण आधी धक्काबुक्की आणि नंतर मारामारीपर्यंत गेलं, ज्यानंतर काही लोकांना यामध्ये पडून भांडणं सोडवण्याचा प्रयत्न केला.
दीपक कुमार नावाच्या यूट्यूब चॅनलवर लग्नाशी संबंधित हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 22 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ज्यावर लोकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत.