Nitin Gadkari NHAI's Infrastructure Investment Trust (InvIT) : परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी नव्या गुंतवणुकदारांसाठी चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI's Infrastructure Investment Trust (InvIT)) वतीनं आज (28 ऑक्टोबर) मुंबई शेअर बाजारात नवं कर्जरोखे (Bonds) लॉन्च करण्यात आले आहे. (Bonds in Share Market) नितीन गडकरी यांनी उद्घाटन समारंभात हजेरी लावली होती आणि नव्या गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आता छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे.देशातील महामार्गांच्या बांधणीत पैसे गुंतवण्याची संधी आता आजपासून उपलब्ध झाली आहे. कर्जरोख्यांच्या (Returns from Bonds) माध्यमातून वार्षिक 8.05 टक्के (Annual Returns) मोबदल्याची हमी (Returns to Investors) गुंतवणूकदारांना मिळणार आहे. (nitin gadkari give good news for new entrepreneurs risk free investment option available)
गुंतवणूकदारांना या कर्जरोख्यांमध्ये किमान 10 हजारापासून गुंतवणूक करता येणार आहे. इन्व्हीआयटी (InvIT NCD) नावाने गुंतवणूकदार कर्जरोख्यांची खरेदी-विक्री मुंबई शेअर बाजारात (Bombay Stock Exchange) करू शकतात. निवृत्त नागरिक (Retired Citizens), नोकरदार (Salaried Individuals), लघु आणि मध्यम उद्योजक (Small and Medium business owners) यांच्यासाठी ही जोखीम मुक्त (Risk Free Intestment) गुंतवणूकीची उत्तम संधी असून यातून परतावाही (Returns) चांगला मिळणार आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
Today is a historic day and I feel very happy that we could finally give the Retail Investors (retired citizens, salaried individuals, small and medium business owners) an opportunity to participate in the Nation-Building activity. The minimum investment slab is just Rs 10,000/-. pic.twitter.com/Sf2W0YWMZK
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 28, 2022
शेअर बाजारातील गुंतवणूकीमध्ये कमालीची जोखीम असते. निवृत्त नागरिकांना त्यांच्या आयुष्याभरासाठी ठेवलेल्या पुंजीवर अशी जोखीम घेणे तितकसे योग्य ठरत नाही. पण सध्याची बँकेत ठेवलेल्या फिक्स्ड डिपॉझिटवर मिळणाऱ्या व्याजदारातही गेल्या काही वर्षात घट झाली आहे. त्यामुळे जोखीममुक्त (Risk Free) गुंतवणूकीचा उत्तम पर्याय आज गुंतवणूकदारांना उपलब्ध झाला आहे.
नितीन गडकरी यांनी पुढे सांगितले की, InvIT ने आतापर्यंत परदेशी आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून 8,000 कोटींहून अधिक निधी उभारला आहे. NCD इश्यूच्या 25 टक्के हा रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव होता.
काय आहे इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट? (Infrastructure Investment Trust)
इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (Infrastructure Investment Trust) (InvITs) ही गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यासाठी आणि ठराविक कालावधीत रोख प्रवाह (Cash Flow) प्रदान करणार्या मालमत्तेत (Assets) गुंतवणूक करण्यासाठी तयार केली आहे. 'नॅशनल हायवेज इन्फ्रा ट्रस्ट' (National Highways Infra Trust) शुक्रवारच्या सुरुवातीला BSE वर 0.2% ने ₹299 वर खाली होता.
नितीन गडकरी यांचे ट्विट - (Tweet)
केंद्रीय रस्ते विकास आणि परिवहन मंत्री नितीन गडकरींनी ही पंतप्रधान मोदींनी घोषित केल्याप्रमाणे आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या प्रयत्नात सहभागी होण्याची ही उत्तम संधी असल्याचं गुंतवणूकीविषयी ट्विटवर म्हटलं आहे.