आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा दर

Petrol and Diesel Latest Price : 3 ऑगस्ट 2023 रोजी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत. आजही दरात कोणताही बदल झालेला नाही.

आकाश नेटके | Updated: Aug 3, 2023, 08:27 AM IST
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचा पेट्रोल डिझेलचा दर title=

Petrol and Diesel Latest Price 3 August : ऑगस्ट (August) महिना सुरू झाला असला तरी महागाईबाबत सर्वसामान्यांना दिलासा मिळालेला नाही. तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. नव्या दरानुसार मुंबईसह अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price) अजूनही स्थिर आहेत. त्याच वेळी, काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत थोडा बदल झाला आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशात आजही  किमती  स्थिर आहेत. गेल्या वर्षी मे 2022 मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत शेवटचा बदल करण्यात आला होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमतीत किंचित वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रूड ऑईल 0.10 डॉलरने वाढून प्रति बॅरल 79.59 डॉलरवर विकले जात आहे. तर, ब्रेंट क्रूड ऑईल 0.12  डॉलरच्या वाढीसह प्रति बॅरल  83.32 डॉलरने विकले जात आहे. दुसरीकडे 3 ऑगस्टसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. 3 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. 3 ऑगस्टलाही पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थेच आहेत. 

दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 प्रति लिटर आणि डिझेलचा दर 89.62 प्रति लिटर आहे. याशिवाय मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 तर डिझेलचा दर 94.27 प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 102.63 तर डिझेलचा दर 94.24 प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल 106.03 आणि डिझेल 92.76 प्रति लिटर आहे. 

पेट्रोलच्या मागणीत वाढ तर डिझेलचा वापर कमी

जुलैमध्ये देशात पेट्रोलचा वापर वाढला, तर मान्सूनच्या पावसामुळे डिझेलची मागणी घटली. उद्योगाच्या सुरुवातीच्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या इंधनाच्या डिझेलची मागणी जुलैमध्ये वार्षिक 4.3 टक्क्यांनी घसरून 6.15 दशलक्ष टन झाली आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात खप तब्बल 15 टक्क्यांनी घसरला, पण दुसऱ्या पंधरवड्यात वाढ झाली. पावसाळ्यात देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे लोकांनी प्रवासाचे बेत पुढे ढकलले आहेत. याशिवाय, कृषी क्षेत्रातील इंधनाची मागणीही कमी झाल्याने डिझेलच्या एकूण मागणीवर परिणाम झाला आहे.