मुंबई : शिवसेनेनं गुजरात विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्षानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता भाजपला कडवं आव्हान मिळणार आहे.
पक्षाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांची झी 24 तासला ही माहिती दिली आहे. 50 ते 75 जागा लढवण्याची प्राथमिक तयारी शिवसेनेची आहे. आज सांयकाळी 4 वाजता अहमदाबादमध्ये याविषयीची घोषणा होणार आहे.
शिवसेना पक्ष तसा गुजरातमध्ये मोठा नाही पण भाजपचा भाऊ म्हणून नेहमी त्याच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेने आता भाजप विरोधी भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने भाजपसाठी ही निवडणूक थोडी आव्हानात्मक जाणार आहे.
राज्यात शिवसेना आणि भाजप युतीचं सरकार असतांना देखील शिवसेना सत्तेत राहून भाजपवर सतत टीका करत असते. त्यामुळे गुजरात निवडणुकीत शिवसेना कोणत्या मुद्द्यावर भाजपला लक्ष्य करते हे देखील पाहावं लागेल.