लखनऊ : लग्न हा सोहळ प्रत्येक नववधू आणि नवरदेवासाठी सर्वात महत्वाचा क्षण असतो, कारण त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्याची नवीन सुरूवात होणार असते. नववधूसाठी हा दिवस सगळ्यात जवळचा आणि भावनिक असतो, कारण या दिवसानंतर तिला नवऱ्याच्या घरी जाऊन नवीन लोकांशी जुळवून घ्यायचं असतं. यासाठी ती आपल्या संसाराचे स्वप्न रंगवते.
परंतु जर त्या नववधूला लग्नातच समजलं की, तिच्या नात्याची सुरुवात एका खोट्या गोष्टीने होतेय, तर? या नववधूवर काय वेळ येईल विचार करा.
असाच एक प्रकार उत्तरप्रदेशामधील इटावा जिल्ह्यात घडला आहे. येथे एका नववधूची तिच्या होणाऱ्या नवरदेवाकडून खूप मोठी फसवणूक होते. याची माहिती या नववधूच्या मैत्रीणी तिला देतात. ज्यानंतर ती हे लग्न मोडून नवरदेवा आणि त्याच्या कुटुंबीयांना परवावून लावते.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री लग्नसोहळा होणार होता, पण त्यादिवशी नवरदेवाचं सिक्रेट सर्वांसमोर आलं आणि त्यानंतर वधूने लग्नाला नकार दिला. यानंतर कुटुंबीयांनी मुलीला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण तिने काही ऐकले नाही.
एवढेच नाही तर मुलीने आणि मुलीकडच्यांनी मुलाची बाजू ऐकून घेतल, नाही. ज्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळलं. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली. ज्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंतही पोहोचले, मात्र सर्व वऱ्हाड्यांना या सगळ्या प्रकारामुळे वधूला न घेता आणि अनवाणी परतावं लागलं.
भरथाना पोलीस स्टेशन परिसरातील ध्यानपुरा येथील रहिवासी महेश चंद्र यांनी त्यांची मुलगी संगीता हिचे लग्न बिधुना येथील अजय कुमारसोबत निश्चित केले होते. अजय जेव्हा लग्नासाठी मुलीसमोर आला तेव्हा तो खूपच सुंदर दिसत होता आणि त्याच्या डोक्यावरचे केसही छान दिसत होते.
16 फेब्रुवारीला मुलीच्या वडिलांनी बिधुना गाठून मुलासोबत लग्नाचा विधी पार पाडला आणि त्यानंतर ठरलेल्या वेळेनुसार 22 फेब्रुवारीला ही वरात मुलीच्या दारी आली.
ज्यानंतर लग्नाच्या अर्ध्या विधी देखील पार पडल्या, नवरदेव आणि नवरी दोघांनी एकमेकांना वरमाला देखील घातल्या. सर्व काही ठीक चालले होते, इतक्यात त्या मुलीलाच्या मैत्रीणींना मुलाच्या डोक्यावरचे खोटे केस असल्याचे कळले.
त्यावेळेस त्यांनी नवरीला याबद्दलची माहिती दिली असता, नवरीने ही गोष्ट आपल्या कुटुंबियांना सांगितली आणि लग्नाला नकार दिला. नातेवाइकांनी या गोष्टीची शहानिशा केली असता, त्या मुलाने प्रत्यक्षात डोक्यावर लोकांच्या विग घातल्याचे व डोक्यावर केस फारच कमी असल्याचे आढळून आले.