मुंबई : देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. तज्ज्ञांनुसार तिसरी लाट लवकरच येण्याची शक्यता आहे. यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना सावध आणि सजग राहण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. (Still need to focus on 5 formulas including testing tracking vaccination instructions to central government states)
पत्रात म्हटलंय की, "पॉझिटीव्हीटी रेट किंवा रुग्णालयात रुग्णसंख्येत वाढ या आणि यासारखे इतर कोणतीही लक्षण दिसताच ते रोखण्यासाठी कठोर पाऊल उचलावं".
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना म्हटलंय की, ज्या जिल्ह्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत, तिथे नियमितपणे पाहणी करावी, कारण वेळ असतानाच खबरदारी म्हणून आरोग्य व्यवस्था आणखी मजबूत करता येईल. तसेच त्यासाठी उपाययोजना करता येतील.
"कोरोनावर नियंत्रणासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग, ट्रीट, व्हॅक्सीनेशन आणि कोव्हिड नियमांच पालन करण्यावर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोणताही धोका उद्भवतोय, अशी चाहूल लागताच त्याला थोपवण्यासाठी वेळीच सतर्क होऊन त्यावर उपाय काढावा", असंही गृह सचिवांनी नमूद केलंय.
राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट येताच प्रशासनाने निर्बंध शिथिल केले होते. पत्रानुसार, "19 जूनच्या पत्रात म्हटलं होतं की निर्बंध शिथिल करताना विचारपूर्वक करावे. तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सल्लानेच निर्णय घ्यायला हवं".
संबंधित बातम्या :
गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी लस सुरक्षित की धोकादायक? केंद्र सरकारने काय म्हटलं?
डेल्टा प्लसनंतर आता Lambda Variant चा धोका, आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा