आईने वाचवले मुलाचं प्राण..पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

मुलाला संकटात पाहून आई कसलाही विचार करत नाही, असाच एका आईने केलेल्या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Aug 14, 2022, 12:30 PM IST
आईने वाचवले मुलाचं प्राण..पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video title=
trending video mother saves child from huge cobra video viral on social media in marathi

Trending Video : आई पुढे सगळं जग ठेंगण आहे असं म्हणतात. आई (Mother)आणि मुलाचं (Child) नातं हे सगळ्या नात्यांपेक्षा महान असतं. कारण आई ही आपल्या मुलांवर निस्वार्थ प्रेम करते. मुलासाठी आई आपल्या जीवाचा देखील विचार करत नाही. मुलाला संकटात पाहून आई कसलाही विचार करत नाही, असाच एका आईने केलेल्या धाडसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

आईच्या शौर्याला सलाम

हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ पाहून अंगावर शहारा येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक मुलगा आईसोबत घराबाहेर पडतो. घराच्या दारातून पहिली पायरी उतरल्यावर तिथे एक महाकाय कोब्रा (Cobra) तंग धरुन बसला असतो. मुलाला पाहता क्षणी तो महाकाय कोब्रा फणा काढतो. मृत्यूच्या दारात उभ्या असलेल्या आपल्या लेकराला पाहून आई कसलाही विचार न करता तुला वाचविण्यासाठी पुढे येते. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता या महाकाय कोब्राच्या समोरुन आई मुलाला उचलून घेते. (trending video mother saves child from huge cobra video viral on social media in marathi)

या व्हिडीओमधील आईचं धाडस पाहून सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या आईच्या धाडसाचंही यूजर्स कौतुक करत आहेत.

हा व्हिडीओ कर्नाटकातील मंड्या या गावातील असल्याचं समजतं. तर हा व्हिडीओ Thinker या ट्वीटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आतापर्यंत त्याला 26 हजार व्यूज मिळाले आहेत. तर 252 यूजर्सने हा व्हिडीओ रिट्वीट केला आहे.