Video : सोशल मीडियावर महिलेनं मांडली लग्नानंतरची व्यथा, म्हणाली, "हा माणूस..."

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये असे दिसून येते की,...

Updated: Jul 30, 2021, 04:55 PM IST
Video : सोशल मीडियावर महिलेनं मांडली लग्नानंतरची व्यथा, म्हणाली, "हा माणूस..." title=

मुंबई :  पती -पत्नी म्हटलं की, प्रेम, राग, रुसवे फुगवे हे सगळ येतातच. लग्नानंतर पती-पत्नीला संबंध मजबूत करण्यासाठी बर्‍याच टप्प्यांतून जावे लागते. बरीच तडजोड देखील करावी लागते, ज्यामुळे कित्येकदा नवरा किंवा बायकोच्या मनाप्रमाणे काही होत नाही. या सगळ्यामध्ये बऱ्याचदा बायकोलाच सगळ्या परिस्थितीशी मिळतं जुळतं घ्यावं लागतं, कारण तिला नवीन घरात जाऊन नवीन चालिरीती आणि नवीन लोकांबरोबर स्वत:ला अ‍ॅडजस्ट करावं लागतं.

त्यामुळे नवीन नवरीची सहाजिकच चिडचीड होते. परंतु जेव्हा बायको रागावते तेव्हा मात्र नवऱ्याची देखील तारेवरची कसरत सुरु होते. त्याला त्याच्या बायकोचा रुसवा काढण्यासाठी अनेक पापड लाटावे लागतात. अशाच प्रकारचा एक व्हिडीओ इंटरनेटवर सध्या व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, एक महिला आपल्या पतीशी भांडत आहे आणि मग तो कॅमेरासमोर येऊन तिचे दु:ख व्यक्त करते, हे दु:ख व्यक्त करताना ही पत्नीने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणौतच्या 'तनु वेड्स मनु' या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा एक लोकप्रिय संवाद कॅमेरा समोर बोलते.

व्हिडीओमध्ये पाहिले जाऊ शकते की, नवरा जमिनीवर बसला आहे, तेव्हा नवरी कंगनाचे अनुकरण करते, ते म्हणते की, 'माझ्या वडिलांना चहाचा एक कप बनवून मी दिला नाही. पण या माणसाचे कपडे मी धुतले. याच्यसाठी जेवण बनवते. तर हा मला सांगतो तुझे मनोरंजन करण्यासाठी मुलांचे क्रॅश गेम खेळ. मी जे आत्तापर्यंत इतकं केले, तरीही याला त्याचे कौतुक नाही. मला वाटले की हे बदलेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

बायकोचा हा व्हिडीओ आतापर्यंत एक लाख 43 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यामध्ये या महिलेनं महिलांच्या आयुष्यातील काही खरे किस्से अगदी मजेदार पद्धतीने सांगितले आहे. ज्याला लोकांकडून खूप पसंत केले जात आहे. यावर लोकांच्या वेगवेगळ्या आणि मजेदार कमेंट्स देखील येत आहेत.