Corona Vaccine घेतल्यानंतर 24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू

कुटुंबीयांचे आरोप  

Updated: Jan 18, 2021, 10:19 AM IST
Corona Vaccine घेतल्यानंतर 24 तासांत वॉर्डबॉयचा मृत्यू

नवी दिल्ली : गेल्या वर्षी कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं होतं. आजही देश काही प्रमाणात कोरोनाच्या विळख्यात आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी भारतासोबतच अनेक राष्ट्रांमध्ये लसीकरण मोहिमेस सुरवात झाली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे लस घेणाऱ्या नागरिकांना लसीमुळे साईड इफेक्ट झाल्याचे देखील समोर येत आहे. नुकताच मोरादाबाद येथे जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या एका 46 वर्षीय वॉर्डबॉयने कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर दुसऱ्या त्यांचा दिवशी मृत्यू झाला. 

तर लस घेतल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या कुटुंबीयांनी केला आहे. महिपाल सिंह असं वॉर्डबॉयचं नाव आहे. १६ जानेवारीला त्याने कोरोना लस घेतली होती. कोरोना लस घेतल्यानंतर महिपालची प्रकृती बिघडली असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

नाईट ड्युटी संपल्यानंतर त्यांना छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास होणे त्याचबरोबर कफचा त्रास जाणवू लागला. प्रकृती बिघडल्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलं की, 'वॉर्ड बॉयला शनिवारी १२च्या सुमारास लस देण्यात आली होती. नाईट शिफ्ट संपल्यानंतर त्याला त्रास होवू लागला. वॉर्ड बॉयचा  मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी त्यांचे शवविच्छेदन केले जणार आहे.